‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये अहमदनगर महापालिका राज्यात तिसरी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियानामध्ये नगर महानगरपालिकेने ‘ड’ वर्ग गटात राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. नाशिक विभागामधून प्रथम क्रमांक मिळविला. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये एकूण 9500 पैकी अहमदनगर महापालिकेने 7155 गुण मिळवले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत कचरामुक्त शहर (जीएफसी) म्हणून थ्री स्टार मानांकन प्राप्त केले असून हागणदारीमुक्त शहर (ओडीएफ++) … The post ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये अहमदनगर महापालिका राज्यात तिसरी appeared first on पुढारी.

‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये अहमदनगर महापालिका राज्यात तिसरी

नगर : Bharat Live News Media वृत्तसेवा :  केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2023 अभियानामध्ये नगर महानगरपालिकेने ‘ड’ वर्ग गटात राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. नाशिक विभागामधून प्रथम क्रमांक मिळविला. स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये एकूण 9500 पैकी अहमदनगर महापालिकेने 7155 गुण मिळवले. तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत कचरामुक्त शहर (जीएफसी) म्हणून थ्री स्टार मानांकन प्राप्त केले असून हागणदारीमुक्त शहर (ओडीएफ++) दर्जा प्राप्त झाला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या तुलनेने या वर्षी महापालिकेने चांगली कामगिरी केली असून महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण मानांकन सुधारले आहे. महापालिकेमार्फत शहरातील दैनंदिन कचरा संकलनासाठी 97 वाहनांद्वारे संकलन करून त्या कचर्‍यावर बुरुडगाव येथे असलेल्या प्रक्रिया केंद्रांवर प्रक्रिया केली जाते. बुरुडगाव कचरा डेपो येथे 100 मे.टन व 50 मे.टन प्रतिदिन असे दोन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती होते. सुक्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी 60 मे.टन प्रतिदिन प्रकल्प कार्यरत आहे. तसेच, मृत होणारे जनावरे यांची विल्हेवाट लावण्याकामी 300 कि. ग्रॅ. प्रतितास क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित आहे.
महापालिकेचे सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची दैनंदिन स्वच्छता व देखभाल महानगरपालिकेमार्फत केली जाते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये वेळोवेळी सहभाग घेऊन शहरातील स्वच्छता व आरोग्य व्यवस्था सुधारण्यामध्ये महापालिकेने उत्तम कामगिरी केली आहे. शहर स्वच्छता अभियानामध्ये आमदार संग्राम जगताप, माजी महापौर रोहिणी शेंडगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी सभापती स्थायी समिती गणेश कवडे, माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, माजी सभागृहनेते विनीत पाऊलबुद्धे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. यापुढील काळात प्रशासनाच्या विविध उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.
Latest Marathi News ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये अहमदनगर महापालिका राज्यात तिसरी Brought to You By : Bharat Live News Media.