नांदेड : माळेगावच्या यात्रेत ‘उधार’ गाढवांचा बाजार; २५ वर्षांची परंपरा कायम

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा यळकोट… यळकोट… जय मल्हार…च्या जयघोषात आज (दि.१२) सुरू झाली. शासकीय पूजा आटोपून देवस्वारी पालखी मिळवणूक काढून, खोबरे, बेल भंडारा उधळत, यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात यात्रेला सुरुवात झाली.  Nanded News दरम्यान, या यात्रेत देशभरातील विविध राज्यातून घोडा, … The post नांदेड : माळेगावच्या यात्रेत ‘उधार’ गाढवांचा बाजार; २५ वर्षांची परंपरा कायम appeared first on पुढारी.

नांदेड : माळेगावच्या यात्रेत ‘उधार’ गाढवांचा बाजार; २५ वर्षांची परंपरा कायम

नांदेड, Bharat Live News Media वृत्तसेवा : दक्षिण भारतातील सर्वात मोठी आणि सुप्रसिद्ध नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा यळकोट… यळकोट… जय मल्हार…च्या जयघोषात आज (दि.१२) सुरू झाली. शासकीय पूजा आटोपून देवस्वारी पालखी मिळवणूक काढून, खोबरे, बेल भंडारा उधळत, यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात यात्रेला सुरुवात झाली.  Nanded News
दरम्यान, या यात्रेत देशभरातील विविध राज्यातून घोडा, गाढव, उंट, खेचर, कुत्रा, मांजर, बैल, गाय, म्हैशी घेऊन व्यापारी नेहमीप्रमाणे या यात्रेत दाखल झाले आहेत. Nanded News
उत्तम जागा पाहुणी, मल्हारी देव नांदे गड जेजुरी या जयघोषात, यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडार्‍याची उधळण करत पारंपरिक पध्दतीने यात्रेला सुरुवात झाली. माळेगावच्या श्रीखंडोबा रायाच्या यात्रेचा शुभारंभ झाला. भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यात माळेगाव यात्रेत असे अनेक आश्चर्यचकित करून टाकणारे व्यवहार केले जातात. अनेक रुढी आणि परंपरांनी नटलेल्या या यात्रेचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथला उधारी गाढव बाजार. देशी, गावरान, जंगली आणि काठेवाडे, लसण्या या पाच जातींच्या गाढवांची येथे जोरदार खरेदी – विक्री सुरू आहे. पाच हजार रुपयांपासून ते चाळीस हजार रुपयांपर्यंतचा गाढवांचा हा बाजार चालतो. तो मात्र उधारीवर. या यात्रेतील पैसे पुढच्या यात्रेत देण्यात येतात. आणि ही परंपरा गेल्या २५ वर्षांपासून अविरत सुरू आहे.
हेही वाचा 

नांदेड : एसपी सांगा, अवैध धंद्यांवर कारवाई कधी?, शहरात 200 तर जिल्ह्यात 2000 मटका अड्डे सुरू
नांदेड: यळकोट यळकोट जय मल्‍हारच्या जयघोषात माळेगाव यात्रेला सुरुवात
Pune : नांदेडला दारूच्या दुकानावर दरोडा

Latest Marathi News नांदेड : माळेगावच्या यात्रेत ‘उधार’ गाढवांचा बाजार; २५ वर्षांची परंपरा कायम Brought to You By : Bharat Live News Media.