मैदान गाजवणारे क्रिकेटपटू गेले तुरुंगात
नवी दिल्ली : नेपाळचा क्रिकेटपटू संदीप लामिछाने याला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आठ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू कोणत्याही गुन्ह्यात तुरुंगात न जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा खेळाडूंची मोठी यादी आहे. अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना हत्येपासून ते बलात्कारापर्यंतच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवण्यात आले होते. जगभरातील सर्वच क्रिकेट राष्ट्रांमध्ये चाहते खेळाडूंना आपला हीरो मानतात; परंतु काही वेळा काही खेळाडू अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीचा सत्यानाश होतो. (Cricket Player)
शहादत हुसेन : बांगला देशसाठी 50 हून अधिक एकदिवसीय सामने खेळलेल्या शहादत हुसेनला बांगला देशमध्ये फरारी घोषित करण्यात आले. त्याच्यावर 11 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे शोषण केल्याचा आरोप होता. ती मुलगी शहादतच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची. (Cricket Player)
मोहम्मद आमीर : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर इंग्लंडमध्ये स्पॉट फिक्सिंग करताना आढळला होता. त्यानंतर त्याला अटक झाली आणि तुरुंगात जावे लागले. आमीरबरोबर सलमान बट आणि मोहम्मद आसिफही होते. या घटनेने संपूर्ण पाकिस्ताचे नाव खराब झाले होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील केली होती. सध्या हे क्रिकेटपटू शिक्षा भोगून बाहेर आले आहेत, तसेच तिघांनीही काही वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
नवज्योतसिंग सिद्धू : माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू याच्यावर हत्येचा आरोप आहे. 1988 मध्ये रागात गाडी चालवत असताना रस्त्यात त्याच्यामुळे अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी सिद्धूला नाममात्र दंड ठोठावण्यात आला आणि त्याला जामीन मिळाला; परंतु पीडित कुटुंबाने हार मानली नाही आणि खटला लढवत ठेवला. त्यानंतर 2022 मध्ये त्याला दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाने सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
जेकब मार्टिन : भारताकडून 10 एकदिवसीय सामने खेळणार्या जेकब मार्टिनला 2011 मध्ये मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. बेकायदेशीरपणे लोकांना इंग्लंडमध्ये पाठवल्याचा आरोप त्याच्यावर होता.
रुबेल हुसैन : 2015 मध्ये वर्ल्ड कपच्या अगदी आधी, बांगला देशी गोलंदाज रुबेल हुसैनवर त्याची मैत्रीण असलेल्या एका महिलेने बलात्कार आणि प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप केला होता. रुबेलने लग्नाच्या बहाण्याने तिच्याशी संबंध ठेवले आणि वचन मोडल्याचे आरोपात म्हटले आहे. त्यामुळे रुबेलला तुरुंगात जावे लागले.
ख्रिस लुईस : इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू ख्रिस लुईस याला 2009 मध्ये अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी 13 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ख्रिस त्याच्या किट बॅगमध्ये ज्यूस बॉक्समध्ये लपवून ड्रग्जची तस्करी करत होता.
एस. श्रीसंत : भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतला 2013 मध्ये आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली तुरुंगात जावे लागले होते. श्रीसंतबरोबर अजित चंडीला आणि अंकित चव्हाणही अडकले होते. मात्र, नंतर सुप्रीम कोर्टाने श्रीसंतला सर्व आरोपातून दोषमुक्त केले. त्यानेदेखील सर्व क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली आहे.
मोहम्मद अझरुद्दीन : क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मॅच फिक्सिंग घोटाळा 2000 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेदरम्यान उघडकीस आला होता. सामना फिक्स करण्यासाठी दोन्ही संघांतील पाच खेळाडू बुकींच्या संपर्कात असल्याचे दिल्ली पोलिसांनी उघड केले. टीम इंडियाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए यांच्यावर आरोप होते. क्रोनिएने सुरुवातीला आरोप फेटाळले, पण नंतर कबूल केले की अझहरने त्याची बुकीशी ओळख करून दिली होती. अझहरसह अजय जडेजा यांच्यावर नंतर आजीवन बंदी घालण्यात आली होती. क्रोनिएचा 2002 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाला. 8 नोव्हेंबर 2012 रोजी आंध्र प्रदेश सरकारने त्यांच्यावरील आरोप चुकीचे असल्याचे म्हटले आणि त्यांना निर्दोष मुक्त केले.
मखाया एन्टिनी : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मखाया एन्टिनीला 1998 मध्ये लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. त्याच्यावर पूर्व लंडनमधील एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप होता; परंतु न्यायालय त्याला दोषी सिद्ध करू शकले नाही आणि तुरुंगात अल्प कालावधीनंतर त्याची सुटका झाली. एन्टिनीने कसोटीत 309 आणि एकदिवसीय सामन्यात 266 विकेटस् घेत यशस्वी क्रिकेट कारकीर्द केली. (Cricket Player)
इम्रान खान : माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या सत्तेच्या काळात महागड्या सरकारी भेटवस्तू विकून नफा मिळवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती आणि पाच वर्षे सक्रिय राजकारणात भाग घेण्यास बंदी घातली. पाकिस्तान तहरीक-ए इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान यांना त्यांच्या लाहोर येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली आणि नंतर त्यांची इस्लामाबादला रवानगी करण्यात आली. शांततापूर्ण निषेध करणे हा प्रत्येक पाकिस्तानचा घटनात्मक अधिकार आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
सचित्र सेनानायके : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्र सेनानायकेला मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला परदेशात जाण्यास बंदी घातली होती. सेनानायकेवर लंका प्रीमियर लीग 2020 मधील सामने फिक्स केल्याचा आरोप आहे ज्यामध्ये त्याने दोन खेळाडूंना सामने फिक्स करण्यासाठी प्रवृत्त केले होते.
दानुष्का गुणतिलका : नुकतेच श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुणतिलका याच्यावर बलात्काराचे गंभीर आरोप झाले होते. मात्र, आता दानुष्का गुणतिलका याला या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. वास्तविक, दानुष्का गुणतिलका याला क्लीन चिट मिळाली आहे. या खेळाडूवरील बलात्काराचे आरोप खोटे निघाले. ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स न्यायालयाने श्रीलंकन क्रिकेटपटूला निर्दोष घोषित केले आहे.
ल्यूक पोमर्सबॅक : ऑस्ट्रेलियाच्या ल्यूक पोमर्सबॅकला 9 ऑगस्ट 2009 रोजी दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल अटक करण्यात आली होती. दारू पिऊन त्याने एका अधिकार्यावर हल्ला केला. यानंतर तो कायदेशीर कोठडीतून फरार झाला. नंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. शिक्षा म्हणून, पॉमर्सबॅकचे ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द करण्यात आले. त्याला दंडही ठोठावण्यात आला. यानंतर मे 2012 मध्ये पॉमर्सबॅकवर भारतीय हॉटेलमध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप होता. त्याने त्याच्या लग्द ठरलेल्या मुलीवरही हल्ला केला. या कारणावरून त्याला अटक करण्यात आली. नंतर हे प्रकरण न्यायालयाबाहेर निकाली निघाल्याने त्याच्यावरील सर्व आरोप वगळण्यात आले.
हेही वाचा :
OpenAI CEO Sam Altman | AI जगतातील दिग्गज सॅम ऑल्टमन यांनी बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न, कोण आहे त्यांचा जोडीदार?
मोदी है तो मुमकिन है, मुख्यमंत्र्यांकडून तोंडभरुन कौतुक
अमेरिका, ब्रिटनचा येमेनवर हवाई हल्ला; हुती बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई सुरू | US strikes houthis yemen
The post मैदान गाजवणारे क्रिकेटपटू गेले तुरुंगात appeared first on Bharat Live News Media.