मुळा नदीपात्रात फेसाळलेले पाणी; नदीप्रदूषणात होतेय वाढ
दापोडी : पिंपरी व पुणे हद्दीत वाहणारी मुळा नदी पिंपळे निलख भागात पांढर्या पाण्याने फेसाळली असून पाण्याला दुर्गंधी येत आहे. नदीपात्रात सांडपाणीयुक्त प्रदूषणामुळे मुळा नदीतील पाण्यावर गेल्या काही दिवसांपासून पांढरा फेस तयार होत आहे.मुळा नदीच्या पाण्यात हे सांडपाणी मिसळत आहे. केमिकलयुक्त सांडपाणी याबाबत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सांडपाणी व्यवस्थापनावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुळा नदीपात्रातील पाण्यावर पांढरा फेस दिसत आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने जणू बर्फसदृश्य चित्र पहावयास मिळत आहे. पाण्यावरील तवंग व फेसामुळे पाण्याची दुर्गंधी येत आहे. नद्यांची गटार गंगा झाली आहे. नदी स्वच्छता कामाकडे संबंधित प्रशासनाने उपाययोजनांकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शिरीष साठे यांनी केली आहे.
हेही वाचा
लातूर : मराठा आरक्षणासाठी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने जीवन संपवले
कोल्हापूर : श्री रामाच्या प्रतिमेच्या चांदीची ब्रेसलेट, नाण्यांची मागणी वाढली
तमन्ना भाटिया आणि महेश बाबू एकत्र, सेटवरील फोटो पाहाच
Latest Marathi News मुळा नदीपात्रात फेसाळलेले पाणी; नदीप्रदूषणात होतेय वाढ Brought to You By : Bharat Live News Media.