नांदेड : एसपी सांगा, अवैध धंद्यांवर कारवाई कधी?

नांदेड, पुढारी वृत्तसेवा ः नांदेड जिल्ह्यात मटका, जुगार आणि क्लबच्या नावाखाली अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. कमी श्रमात आणि झटपट पैसा मिळविण्याच्या आशेने गरीब, हमाल, रिक्षाचालक, शेतकरी याकडे आकर्षित झाले आहेत. विशेष म्हणजे धनदांडगे व्यापारी, शिक्षक आणि शासकीय कर्मचारी देखील या अवैध धंद्यात गुंतले आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून मटका अड्डे सुरू आहेत. शहरात 200 तर … The post नांदेड : एसपी सांगा, अवैध धंद्यांवर कारवाई कधी? appeared first on पुढारी.

नांदेड : एसपी सांगा, अवैध धंद्यांवर कारवाई कधी?

नांदेड, Bharat Live News Media वृत्तसेवा ः नांदेड जिल्ह्यात मटका, जुगार आणि क्लबच्या नावाखाली अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत. कमी श्रमात आणि झटपट पैसा मिळविण्याच्या आशेने गरीब, हमाल, रिक्षाचालक, शेतकरी याकडे आकर्षित झाले आहेत. विशेष म्हणजे धनदांडगे व्यापारी, शिक्षक आणि शासकीय कर्मचारी देखील या अवैध धंद्यात गुंतले आहेत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून मटका अड्डे सुरू आहेत. शहरात 200 तर जिल्ह्याभरात सुमारे 2000 पेक्षा अधिक मटका अड्डे असल्यामुळे अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली असतानाही या धंद्यावर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मटका, जुगार आणि क्लब चालकांना पोलिस यंत्रणेचे आशीर्वाद असल्याशिवाय हे सुरू ठेवणे शक्य नाही. ही बाब अनेकदा स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केल्यास अवैध धंदे हद्दपार होण्यास काहीच वेळ लागणार नाही, मात्र पोलीस थातूरमातूर कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत.
दोन दिवसांपूर्वीच शहर पोलिस अधीक्षक किरितिका यांनी मिलगेट येथील एका घरात छापा मारून मोठा जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. किरितिका यांच्या या धडाकेबाज कारवाईनंतर पोलिस यंत्रणा आक्रमक होऊन जिल्हाभरात कारवाया सुरू करतील असे अपेक्षित होते. मात्र ही अपेक्षा फोल ठरली आहे.
आजघडीला नांदेड शहरात 200 तर जिल्ह्याभरात 2000 मटका अड्डे सुरू आहे. पण याकडे पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष असते. ‘हप्त्या’च्या स्वरूपात प्रति महिना लाखो रुपये मिळत असल्याने या अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे धाडस पोलिस दाखवत नाहीत.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे क्षेत्रात वाजेगाव, मुदखेड बायपास, मिल्लतनगर, गटर लाईन, रहीमपूर, ढवळे कॉर्नर, दूध डेअरी, मुजामपेठ, धनेगाव, कोटतीर्थ, नाळेश्वर आणि सुगाव येथे मटका अड्डे सुरू आहेत.
वजिराबाद ठाणे क्षेत्रात वजिराबाद, बसस्टॅण्ड, मिलगेट, बसस्टॅण्ड बोळ, एनटीसी मिलजवळ, पक्कीचाळ, गंगाचाळ, समीरबाग, खडकपुरा येथे मटका अड्ड्यांना बहर आला आहे. तसेच गंगाचाळ आणि खडकपुरा येथे मोठे क्लब देखील सुरू आहेत. शिवाजीनगर ठाणे क्षेत्रात नयी आबादी, गणेशनगर, पावडेवाडी, फुलेनगर, गोकुळनगर, साठे चौक, तेहरानगर, लालवाडी, खोब्रागडेनगर, नवा मोंढा आदी ठिकाणी मटकामाफियांनी बस्थान थाटले आहे.
भाग्यनगर ठाणे क्षेत्रात भाग्यनगर, तरोडा नाका, डी-मार्टजवळ मालेगाव रोड, राज कॉर्नर, पौर्णिमानगर येथे लपूनछपून मटका अड्डे सुरू आहेत. विमानतळ ठाणे क्षेत्रात नूरी चौक, पीरनगर, पीरबुर्‍हाणनगर, विद्युतनगर पाटी आणि अन्य ठिकाणी मटका अड्डे सुरू आहेत.
शहरातील सर्व ठाणे क्षेत्रात मटका अड्डे सुरू असून प्रत्येकाने आपापले विभाग वाटून घेतले आहेत. विशेष म्हणजे हे मटकामाफिया एक – दुसर्‍याच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ करत नसल्याने जिल्ह्यात शांतता असल्याचे भासविले जाते. वजिराबाद, भाग्यनगर आणि विमानतळ ठाणे क्षेत्र टॉपचा जुगारमाफिया कमल यादव ऊर्फ सेठ याचा आहे. ग्रामीण ठाणे क्षेत्रात शफी बिल्डर आणि त्याच्या भागिदारांची चलती आहे.
तर शिवाजीनगर ठाणे क्षेत्रात अब्बास, फिरोज शेख, जमीर यांच्या भागिदारीतून सुमारे 25-30 मटका अड्डे सुरु आहेत. हे सर्व मटका अड्डे खुलेआम सुरू असले तरीही ते पोलिसांना मात्र दिसत नाहीत. हे कशाचे द्योतक म्हणायचे.
पोलिस अधीक्षकांचे विशेष पथक, नांदेड आणि भोकर अपर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकार्‍यांची पथके, स्थानिक गुन्हे शाखा आणि ठाणे स्तरावरील यंत्रणा कुठे काम करतात असा प्रश्न विचारला जातो आहे.
Latest Marathi News नांदेड : एसपी सांगा, अवैध धंद्यांवर कारवाई कधी? Brought to You By : Bharat Live News Media.