अंबड येथे राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेची गाढवावर धिंड

शहागड, Bharat Live News Media वृत्तसेवा : अबंड येथे शिवसेना उबाठा गटाचे माजी आ. शिवाजीराव चोथे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ अंबड वेशीपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेची गाढवावर धिंड काढण्यात आली. यावेळी नार्वेकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करीत शिवसेना उबाठा पक्षाने अबंड बसस्थानक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निकालाचा निषेध करत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी निवेदन दिले. शिवसेनेच्या या आंदेालनामुळे जालना महामार्गावरील वाहतुक जवळपास एक तास जाम झाली होती.
अंबड येथे शिवसेना उबाठा पक्षाच्यावतीने वेशीपासुन अंबड बसस्थानक तसेच तहसिल कार्यालयापर्यंत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना उबाठा गटाच्या विरोधात दिलेल्या निकाला विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाात माजी आमदार शिवाजीराव चोथे, शिवसेना किसान सेनेचे भानुदास घुगे, जगन दुर्गे,शिवसेना गटनेते इलियास कुरेशी,माजी नगरसेवक कुंडलिक धांडे, श्रीमंत खटके, चंद्रकांत लांडे,शहर प्रमुख कुमार रुपवते, राजेश राऊत,दत्ता गुळजकर, गणेश काळे जिल्हा प्रमुख युवा सेना, शिवाजी ढवळे यांच्यासह शिवसैनिकांचा लक्षणीय सहभाग होता.
माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी शिंदे सरकार व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा यावेळी प्रकार असल्याचा आरोप केला. यावेळी मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. सुमारे एक तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे अंबड -जालना मार्गावरील वाहतूक विस्कळीत होउन वाहनांच्या मोठ-मोठया रांगा लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागला.पोलिस बंदोबस्त चोख होता.
पोलिस तैनात
अंबड पोलिसांकडून शिवसेनेच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण, जमादार विष्णू चव्हाण, रामेश्वर मुळक,वाघ,नरवडे यांच्यासह पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी जागोजागी तैनात करण्यात आले होते.
Latest Marathi News अंबड येथे राहुल नार्वेकरांच्या प्रतिमेची गाढवावर धिंड Brought to You By : Bharat Live News Media.
