पूजनीय जावयांसाठी जनकपुरीत लगबग

अयोध्या; वृत्तसंस्था : सीतामातेचे माहेर आणि प्रभू श्रीरामचंद्रांची सासूरवाडी मानली जाणार्‍या नेपाळमधील जनकपूरहून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी तब्बल तीन हजारांहून अधिक भेटवस्तू अयोध्येला पाठविण्यात आल्या आहेत. नेपाळमधील जनकपूर हे सीतामातेचे जन्मस्थान मानले जाते. (Ram Mandir Inauguration) जावईबापूंसाठी वेगवेगळ्या भोगासह भेटवस्तू पाठविण्यासाठी समस्त जनकपुरीमध्ये लगबग आणि उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. नेपाळहून ट्रकद्वारे विविध भेटवस्तू पाठविल्या जात आहेत. … The post पूजनीय जावयांसाठी जनकपुरीत लगबग appeared first on पुढारी.

पूजनीय जावयांसाठी जनकपुरीत लगबग

अयोध्या; वृत्तसंस्था : सीतामातेचे माहेर आणि प्रभू श्रीरामचंद्रांची सासूरवाडी मानली जाणार्‍या नेपाळमधील जनकपूरहून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी तब्बल तीन हजारांहून अधिक भेटवस्तू अयोध्येला पाठविण्यात आल्या आहेत. नेपाळमधील जनकपूर हे सीतामातेचे जन्मस्थान मानले जाते. (Ram Mandir Inauguration)
जावईबापूंसाठी वेगवेगळ्या भोगासह भेटवस्तू पाठविण्यासाठी समस्त जनकपुरीमध्ये लगबग आणि उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळत आहे. नेपाळहून ट्रकद्वारे विविध भेटवस्तू पाठविल्या जात आहेत. पूजा-अर्चेसाठी लागणार्‍या साहित्यापासून सर्व प्रकारच्या वस्तूंचा या भेटवस्तूंत समावेश आहे. तेलाचे 21 हजार कॅनही ट्रकमधून पाठविण्यात आले आहे. याशिवाय चांदीच्या पादुका, वस्त्र-प्रावरणांसह दागिन्यांचा समावेश आहे. जनकपूरहून 30 वाहनांतून या भेटवस्तू पाठविण्यात आल्या आहेत. (Ram Mandir Inauguration)

राम मंदिरातील दरवाजासाठी 10 फूट उंच, 9.5 फूट जाड आणि 4.6 फूट रुंदीचे कुलूप तयार करण्यात आले आहे. या कुलपाचे वजन 400 किलो असणार आहे. अलिगढमधील कारागिरांनी हे कुलूप बनविले आहे.
लखनौस्थित एका भाजीपाल्या विक्रेत्याकडून घड्याळ दान करण्यात येणार आहे. भारत, टोकियो, मॉस्को, दुबई, बीजिंग, सिंगापूर, मेक्सिको सिटी, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आदी आठ देशांतील शहरातील वेळ एकाच वेळी या घड्याळ्यात दिसणार आहे.
अशोक वाटिकेतून आणला खडक
सीतामातेला बंदिवासात ठेवलेल्या श्रीलंकेतील अशोक वाटिकामधूनही विशेष भेटवस्तू पाठविण्यात आल्या आहेत. श्रीलंकेतून अयोध्येत आलेल्या शिष्टमंडळाने मंदिर समितीला अशोक वाटिकेतील खडक भेट दिला आहे.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी पाठविल्या तीन हजारांवर भेटवस्तू
 
500 किलोचा नगारा…
अहमदाबाद : येथील डगबार समाजाच्यावतीने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी 500 किलो वजनाचा नगारा (ड्रम) तयार करण्यात आला आहे. यामध्ये लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात आला आहे. हे वाद्य अनेक वर्ष टिकणार आहे.
तपोभूमीतील 56 साधुसंत आतुर
प्रभू श्रीरामचंद्र यांनी चित्रकूट या ठिकाणी साडेअकरा वर्षांचा वनवास पूर्ण केला होता. या ठिकाणाहून दिगंबर आखाडा आणि कामतानाथच्या मुख्य महंतांसह 56 साधुसंत सोहळ्यात सहभागी होणार आहेत. या सर्वांना सोहळ्याचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. प्रभू श्रीराम यांचा जन्म अयोध्येत झाला असला तरी चित्रकूटशी त्यांचे नाते वेगळेच आहे. या ठिकाणी त्यांनी 14 वर्षे वनवासातील 11 वर्षे सहा महिन्यांचा कालावधी व्यतीत केला होता. चित्रकूटला रामाची तपोभूमी समजली जाते.
हेही वाचा :

मराठवाड्याची दुष्काळी ओळख मिटवणार; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
कोल्‍हापूर : दुर्गमानवाड-कसबा तारळे मार्गावर ट्रक पलटी; अवैध बॉक्साईट असल्‍याचा ग्रामस्‍थांचा आरोप
कला शेल्फ सजवण्याची

Latest Marathi News पूजनीय जावयांसाठी जनकपुरीत लगबग Brought to You By : Bharat Live News Media.