Olya kajuchi bhaji : चविष्ठ ओल्या काजूची भाजी

बाजारात ओले काजू दिसले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.; पण त्या ओल्या काजूंची भाजी चविष्ट (Olya kajuchi bhaji ) होण्यासाठी नेमकी कोणती कृती वापरायची, हे अनेकांना उमगत नाही. त्यासाठीच ही रेसिपी काजूच्या चविष्ट भाजीची! (Olya kajuchi bhaji ) अनेकांना ढाब्यावर बनवलेल्या जेवणाची चव चाखायला आवडते. अशीच चव तुम्हाला घरी बनवलेल्या पदार्थांमधून मिळाली तर? चला तर … The post Olya kajuchi bhaji : चविष्ठ ओल्या काजूची भाजी appeared first on पुढारी.

Olya kajuchi bhaji : चविष्ठ ओल्या काजूची भाजी

बाजारात ओले काजू दिसले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.; पण त्या ओल्या काजूंची भाजी चविष्ट (Olya kajuchi bhaji ) होण्यासाठी नेमकी कोणती कृती वापरायची, हे अनेकांना उमगत नाही. त्यासाठीच ही रेसिपी काजूच्या चविष्ट भाजीची! (Olya kajuchi bhaji )
अनेकांना ढाब्यावर बनवलेल्या जेवणाची चव चाखायला आवडते. अशीच चव तुम्हाला घरी बनवलेल्या पदार्थांमधून मिळाली तर? चला तर मग ‘ओल्या काजूची भाजी’ अशा प्रकारे बनवा.
Recipe By स्वालिया शिकलगार Course: लंच Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपेServings५ minutes Preparing Time३० minutes Cooking Time३० minutes Calories kcal INGREDIENTSअर्धा किलो ओले सोललेले काजूएक कांदा मध्यम आकाराचामध्यम आकाराचे दोन बटाटेएक वाटी तेलएक छोटा चमचा हळदतीन चमचे मालवणी मसालावाटणासाठी दोन कांदेअर्धी वाटी ओला खोवलेला नारळअर्धी वाटी सुक्या नारळाचा किसअर्धा इंच आलंसोललेल्या लसणाच्या पाच पाकळ्याअर्धा चमचा बडीशेपतीन-चार काळे मिरेलवंगदालचिनीचा छोटा तुकडादगडफूलथोडी खसखसतमालपत्राची एक-दोन पानं.DIRECTIONतीन कांदे उभे कापून ते तेलावर तांबूस रंगावर भाजून घ्याओलं आणि सुकं खोबरंही वेगवेगळं भाजून घ्यासुकं खोबरं भाजताना त्यातच आलं-लसूण आणि वर म्हटलेला खडा मसाला टाकानंतर हे सर्व भाजलेलं साहित्य मस्त बारीक वाटून घ्यावाटण तयार झाल्यावर एका पसरट भांड्यात उरलेलं तेल टाकून ते कडकडीत तापल्यावर त्यात उरलेला एक कांदा बारीक चिरून टाकाकांदा शिजल्यावर त्यात हळद-मसाला टाकून ते परतून घ्याकडेने तेल सुटू लागल्यावर त्यात पाणी टाकानंतर काजू आणि सोललेल्या बटाट्याचे मोठे तुकडे टाकून ढवळाथोड्या वेळाने वर तर्री आल्यावर दीड मोठे चमचे वाटण टाकाचवीपुरतं मीठ टाकाझाली काजूची भाजी तयारNOTES
The post Olya kajuchi bhaji : चविष्ठ ओल्या काजूची भाजी appeared first on Bharat Live News Media.