अमेरिका, ब्रिटनचा येमेनवर हवाई हल्ला; हुती बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई सुरू

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्कराने लाल समुद्रात हुती बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. दोन्ही देशांच्या लष्कराने येमेनमधील हुती बंडखोरांच्या ताब्यातील ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. हुती बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते, अखेर या बंडखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनने लष्करी कारवाईचे पाऊल उचलले … The post अमेरिका, ब्रिटनचा येमेनवर हवाई हल्ला; हुती बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई सुरू appeared first on पुढारी.

अमेरिका, ब्रिटनचा येमेनवर हवाई हल्ला; हुती बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई सुरू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अमेरिका आणि ब्रिटनच्या लष्कराने लाल समुद्रात हुती बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई सुरू केली आहे. दोन्ही देशांच्या लष्कराने येमेनमधील हुती बंडखोरांच्या ताब्यातील ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. हुती बंडखोरांनी लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर सातत्याने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते, अखेर या बंडखोरांना नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटनने लष्करी कारवाईचे पाऊल उचलले आहे. (US strikes houthis yemen)
हमास आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू झाल्यानंतर येमेनमधील हुती बंडखोरांनी पॅलेस्टाईन आणि हमासच्या समर्थनात लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर हल्ले सुरू केले. हुती बंडखोरांना इराणचे पाठबळ आहे. (US strikes houthis yemen)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले, “माझ्या आदेशानुसार अमेरिकेच्या लष्कराने, ब्रिटनच्या मदतीने येमेनवर यशस्वी हल्ले केले आहेत. या कारवाईत ऑस्ट्रेलिया, बहरिन, कॅनडा, नेदरलँड यांचा पाठिंबा मिळाला. लाल समुद्र हा अत्यंत महत्त्वाचा व्यापारी समुद्री मार्ग आहे. या समुद्री मार्गाची सुरक्षा हुती बंडखोरांनी धोक्यात आणली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आमच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी आम्ही पुढेही कारवाई करू.” असे CNNने दिलेल्या बातमीत म्हटले आहे.
कोण आहेत हुती? US strikes houthis yemen
हुती येमेनमधील शिया मुस्लिमांची राजकीय आणि लष्करी संघटना आहे. येमेनमध्ये सौदी अरेबियाच्या पाठबळावर सरकार सत्तेत आहे. त्या विरोधात हुतींनी नागरी युद्ध छेडले आहे. हुतीचे उपपरराष्ट्र मंत्री हुसेन अल इज्झी म्हणाले, “येमेनवर आक्रमण झाले आहे, त्याला आम्ही प्रत्युत्तर देणार नाही, असे होऊ शकत नाही. फक्त व्यापारी जहाजांवरील हल्ल्याच्या पलीकडे ही आम्ही विचार करू.”
हेही वाचा

युद्ध : झळा इस्रायल-हमास युद्धाच्या
Israel-Hamas War : उत्तर गाझात हमास संपुष्टाकडे
रक्‍तरंजित संघर्षाचे तीन महिने..! इस्‍त्रायल-हमास युद्धात आतापर्यंत काय घडलं?

 
Latest Marathi News अमेरिका, ब्रिटनचा येमेनवर हवाई हल्ला; हुती बंडखोरांविरोधात लष्करी कारवाई सुरू Brought to You By : Bharat Live News Media.