मुलायमसिंह तत्कालीन पंतप्रधानांचा फोन उचलत नव्हते
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरासाठी अनेक प्रभूतींनी योगदान दिले आहे. राम मंदिर आंंदोलनावेळी बाबरी पतनाची खबर मुलायमसिंह यांना दोन दिवस आधीच लागली होती. बाबरी पतनाच्या आधी दोन दिवस राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांची भेट घेतली होती. (Mulayam Singh Yadav)
कारसेवकांच्या सुटकेस होता विरोध
गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानंतर गोळीबाराची घटना
बाबरी पतनानंतर भाजपविरोधात राजकीय मोट
अयोध्या प्रकरणात मुलायमसिंह यांची एंट्री 1990 साली झाली. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी एल्गार पुकारला होता. (Mulayam Singh Yadav)
बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांनी समस्तीपूर या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना अटक केली होती.
कारसेवकांचा भव्य मोर्चा अयोध्येत धडकल्यानंतर मुलायमसिंह कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यामुळे त्यांनी कारसेवकांच्या आंदोलनावर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यामध्ये 28 कारसेवकांनी हौतात्म्य पत्करले होते. तथापि, मृतांचा आकडा जास्त असण्याची शक्यता असल्याने अधिकृत आकडेवारी गुलदस्त्यातच ठेवण्यात आल्याचे समजते.
1989 साली शिलान्यास झाल्यानंतर अनेक कारसेवकांना अटक करण्यात आली होती. राम मंदिर आंदोलन टिपेले पोहोचले असल्यामुळे, तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग मुलायमसिंग यांना फोन करीत होते. मुलायमसिंग त्यांचा फोन उचलत नव्हते.
व्ही. पी. सिंग यांच्यावर कारसेवकांच्या सुटकेसाठी दबाव होता. त्यांच्या सरकारला भाजपचा पाठिंबा होता. त्यामुळे सिंग मुलायम यांना फोन करीत होते. मुलायम मात्र कारसेवकांच्या सुटकेच्या विरोधात होते. त्यामुळेच ते पंतप्रधानांचा फोन उचलत नव्हते.
अखेर व्ही. पी. सिंग यांच्या रेट्यामुळे मुलायम यांना कारसेवकांची सुटका करण्यास भाग पडले होते. त्यामुळे व्ही. पी. सिंग आणि मुलायम यांच्यात या घटनेमुळे कायमचा दुरावा निर्माण झाला होता.
30 ऑक्टोबर 1990 रोजी आझम खान यांनीही बाबरीचे पतन रोखण्यासाठी मुलायमसिंह यांना विनंती केली होती.
मुलायम यांना गुप्तचर यंत्रणांकडून बाबरी पतनाची दोन दिवस आधीच कुणकुण लागली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी 4 डिसेंबर 1992 साली भेट घेतली होती. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी त्यांनी शर्मा यांच्याकडे केली होती.
त्यावेळी केंद्रात नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. राष्ट्रपती शर्मा यांनाही बाबरी पतनाची माहिती होती, असा गौप्यस्फोट मुलायम यांनी 2013 साली केला होता.
बाबरी पतनानंतर मुलायमसिंह यांनी भाजपविरोधात राजकीय मोट बांधण्यासाठी दलित, मुसलमान आणि यादव यांच्याशी जवळीक साधली. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते कांशीराम यांच्यासोबत युती केली होती. 1993 साली त्यांच्या आघाडीने भाजपची सत्ता उलथावून लावली.
हेही वाचा :
Anganwadi Sevika Movement: अंगणवाडी सेविकांच्या संपावर प्रशासनाचा बडगा, कारणे दाखवा नोटीस
Steve Smith Djokovic : जोकोच्या हातात बॅट; स्मिथच्या हातात रॅकेट
Yearly Horoscope 2024 : मीन, वार्षिक भविष्य २०२४ : संमिश्र अनुभवाचे, गुरुकृपेचे वर्ष
Latest Marathi News मुलायमसिंह तत्कालीन पंतप्रधानांचा फोन उचलत नव्हते Brought to You By : Bharat Live News Media.