‘पुढारी टॅलेंट-सर्च एक्झाम’ 3 फेब्रुवारीला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, यासाठी दै. ‘पुढारी’तर्फे दि. 3 फेब्रुवारी रोजी ‘पुढारी टॅलेंट-सर्च एक्झाम’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 31, तर कोल्हापूर शहरात 9 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेची जय्यत तयारी सुरू आहे. शालेय ते महाविद्यालयापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची क्रेझ दिसून येते. स्पर्धा परीक्षेत … The post ‘पुढारी टॅलेंट-सर्च एक्झाम’ 3 फेब्रुवारीला appeared first on पुढारी.

Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’ 3 फेब्रुवारीला

कोल्हापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, यासाठी दै. ‘Bharat Live News Media’तर्फे दि. 3 फेब्रुवारी रोजी ‘Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 31, तर कोल्हापूर शहरात 9 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेची जय्यत तयारी सुरू आहे.
शालेय ते महाविद्यालयापर्यंत सर्वच विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची क्रेझ दिसून येते. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी खडतर परिश्रम घेतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेबद्दल आवड, रुची निर्माण व्हावी, यासाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शिष्यवृत्ती व प्रज्ञाशोध परीक्षेच्या धर्तीवर दै.‘Bharat Live News Media’तर्फे ‘Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’ घेण्यात येणार आहे. ही परीक्षा तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. मराठी व सेमी इंग्लिश माध्यमांचा यात समावेश आहे. प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल.
पेपर क्र.1 मराठी, गणितसाठी 75 प्रश्नांसाठी 150 गुण असणार आहेत. हा पेपर सकाळी 11 ते 12.30 या वेळेत होईल. पेपर क्र.2 इंग्रजी, बुद्धिमत्ता 75 प्रश्न व 150 गुण असतील. दुपारी 1.30 ते 3 या कालावधीत पेपर होईल. ‘ओएमआर’शीटवर 300 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्ह्यासह तालुका व शहराच्या ठिकाणी परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेचा निकाल मार्चमध्ये जाहीर केला जाणार आहे. दोन विद्यार्थ्यांना समान गुण मिळाल्यास पेपर दोनमध्ये जास्त गुण असतील तो पहिला असेल. त्यातही समान गुण मिळाल्यास लहान वय असणार्‍या विद्यार्थ्यास पहिला क्रमांक दिला जाईल.
शहर, जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे…
कोल्हापूर शहर : न्यू हायस्कूल, न्यू हायस्कूल मराठी शाखा, रा. ना. सामाणी विद्यालय, स. म. लोहिया हायस्कूल व ज्यु. कॉलेज (पेटाळा, न्यू महाद्वार रोड), लक्ष्मीबाई जरगनगर विद्यामंदिर (जरगनगर), सौ. शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूल (तपोवन), वि. स. खांडेकर प्रशाला (शाहूपुरी), विद्यामंदिर शिंगणापूर (शिंगणापूर), महापालिका टेंबलाईवाडी विद्यामंदिर (टेंबलाईवाडी).
करवीर तालुका : कुमार-कन्या विद्यामंदिर कोगे (कोगे), विद्यामंदिर कणेरीवाडी (कणेरीवाडी), रा.बा. पाटील विद्यालय (सडोली खालसा).
कागल तालुका : शिवराज विद्यालय (मुरगूड), श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल (कागल), विद्यामंदिर बानगे (बानगे), विद्यामंदिर म्हाकवे (म्हाकवे).गडहिंग्लज तालुका : किलबिल विद्यामंदिर (गडहिंग्लज). इचलकरंजी शहर : बालाजी हायस्कूल (विक्रमनगर), राजर्षी शाहू हायस्कूल (गोसावी गल्ली जवळ), कुसुमताई मणेरे हायस्कूल (कबनूर). हातकणंगले तालुका : आदर्श गुरुकुल विद्यालय (पेठवडगाव), डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल (पेठवडगाव). शिरोळ तालुका : पद्माराजे विद्यालय (शिरोळ). पन्हाळा तालुका : कळे विद्यामंदिर अँड ज्यु. कॉलेज (कळे), माजगाव हायस्कूल (माजगाव), आनंदीबाई सरनोबत हायस्कूल (आसुर्ले-पोर्ले), यशवंत हायस्कूल (कोडोली).
राधानगरी तालुका : न्यू हायस्कूल (कसबा तारळे), श्री शिवाजी हायस्कूल (कसबा तारळे), श्री यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय (सोळांकूर). शाहूवाडी तालुका : बांबवडे हायस्कूल (बांबवडे), करंजफेण हायस्कूल (करंजफेण), मलकापूर हायस्कूल, जी. आर. वारंगे ज्यु.कॉलेज (मलकापूर), नंदगाव हायस्कूल (नंदगाव). आजरा तालुका : श्री पार्वती-शंकर विद्यामंदिर (उत्तूर). भुदरगड तालुका : डी. वाय. पाटील शिक्षण संकुल (गारगोटी), कुमारभवन (कडगाव). चंदगड तालुका : दि न्यू हायस्कूल (चंदगड), व्ही. के. चव्हाण पाटील महाविद्यालय (पाटणे फाटा). गगनबावडा तालुका : दत्ताजीराव मोहिते-पाटील हायस्कूल (तिसंगी).
Latest Marathi News ‘Bharat Live News Media टॅलेंट-सर्च एक्झाम’ 3 फेब्रुवारीला Brought to You By : Bharat Live News Media.