थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाणे लाभदायक

आंबट-गोड स्वाद असलेले संत्री सर्वांना आवडतात. संत्री केवळ स्वादासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही लाभदायक आहेत. अनेक लोक उन्हाळ्यात संत्री खाणे पसंद करतात. पण हिवाळ्यात देखील संत्री खाणे फायदेशीर असते. थंडीमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित व्हायला लागते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. यामुळे आवश्यक आहे की थंडीमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्व सेवन केले पाहिजे ज्याने शरीर आरोग्यसंपन्न … The post थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाणे लाभदायक appeared first on पुढारी.

थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाणे लाभदायक

आंबट-गोड स्वाद असलेले संत्री सर्वांना आवडतात. संत्री केवळ स्वादासाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही लाभदायक आहेत. अनेक लोक उन्हाळ्यात संत्री खाणे पसंद करतात. पण हिवाळ्यात देखील संत्री खाणे फायदेशीर असते. थंडीमध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती प्रभावित व्हायला लागते. त्यामुळे अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. यामुळे आवश्यक आहे की थंडीमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्त्व सेवन केले पाहिजे ज्याने शरीर आरोग्यसंपन्न राहील. जर नाश्त्यामध्ये एक ग्लास संत्री ज्यूस सेवन केले तर शरीराला खूप फायदे मिळतील. चला जाणून घेऊया संत्री ज्यूस सेवनाचे फायदे …
इम्युनिटी बूस्टर : संत्र्यामध्ये भरपूर मात्रामध्ये व्हिटॅमिन सी असते. जे आपल्याला इम्युनिटी बूस्ट करण्यास मदत करते. थंडीमध्ये आपली इम्युनिटी म्हणजेच रोगप्रतिकारकता कमजोर व्हायला लागते. इम्युनिटी प्रभावित झाल्यामुळे आपल्या शरीराला काही आजार जडण्याची शक्यता असते. तसेच याबरोबर इन्फेक्शन आणि व्हायरस यांची भीती वाढते. आपली इम्युनिटी मजबूत ठेवण्यासाठी संत्री ज्यूस खूप आरोग्यदायी असते.
ग्लोईंग स्किन : संत्र्यामध्ये भरपूर मात्रामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असते. जे तुमच्या त्वचेला चमकदार बनवते. तसेच तुमच्या स्किनला तरुण ठेवण्यासाठी संत्री ज्यूस खूप फायदेशीर असते. हे डॅमेज स्किनला रिपेअर करते आणि स्किनचे टेक्सचर योग्य करते.
किडनी स्टोनपासून वाचवते : संत्रीच्या ज्यूसमध्ये भरपूर मात्रामध्ये फायबर असते जे किडनी स्टोन या समस्येपासून वाचवते जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही संत्री ज्यूस घेऊ शकता, हे यूरिन पास करायला मदत करते. तसेच किडनी साफ ठेवायला मदत करते.
डोळ्यांसाठी उपयोगी : संत्री ज्यूस डोळ्यांसाठी खूप आरोग्यदायी आहे. हे डोळ्यांची द़ृष्टी चांगली करण्यास मदत करते तसेच डोळ्यांना हेल्दी ठेवते. जर तुम्हाला डोळ्यांसंबंधित इन्फेक्शन आहे तर संत्री ज्यूसमुळे लवकर रिकव्हर होते.
डिहायड्रेशनपासून बचाव : नेहमी थंडीमध्ये डिहायड्रेशन समस्या होते. या समस्येपासून वाचण्यासाठी संत्री ज्यूस आरोग्यदायी आहे हे शरीराला हायड्रेट ठेवायला मदत करते ज्यामुळे ड्राईस्किन, ड्राय लिप्स, पचन समस्या, कब्ज पासून आराम मिळतो. यामुळे संत्री ज्यूस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे.
Latest Marathi News थंडीच्या दिवसांमध्ये संत्री खाणे लाभदायक Brought to You By : Bharat Live News Media.