मनीमाऊचा मराठमोळा श्रृंगार!

मुंबई : पाळीव प्राणी हे आपल्या कुटुंबाचेच सदस्य बनलेले असतात. अनेक लोक आपल्या पाळीव प्राण्यांचीही बरीच हौसमौज करीत असतात. गायीच्या डोहाळे जेवणापासून श्वान-मांजरांच्या लग्नापर्यंतची अनेक उदाहरणे आहेत. आता सोशल मीडियात असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मनीमाऊ चक्क मराठमोळ्या लूकमध्ये ऐटीत बसलेली दिसून येते. गळ्यात ठुशी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर व अंगावर काठापदराच्या … The post मनीमाऊचा मराठमोळा श्रृंगार! appeared first on पुढारी.

मनीमाऊचा मराठमोळा श्रृंगार!

मुंबई : पाळीव प्राणी हे आपल्या कुटुंबाचेच सदस्य बनलेले असतात. अनेक लोक आपल्या पाळीव प्राण्यांचीही बरीच हौसमौज करीत असतात. गायीच्या डोहाळे जेवणापासून श्वान-मांजरांच्या लग्नापर्यंतची अनेक उदाहरणे आहेत. आता सोशल मीडियात असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मनीमाऊ चक्क मराठमोळ्या लूकमध्ये ऐटीत बसलेली दिसून येते. गळ्यात ठुशी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर व अंगावर काठापदराच्या साडीसारखे वस्त्र नेसलेली ही पांढरीशुभ्र मांजर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
या पांढर्‍याशुभ्र मांजरीचे डोळेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. तिचा एक डोळा निळसर तर दुसरा पिवळसर आहे. तिचे नैसर्गिक सौंदर्यच असे आहे आणि त्यामध्येच हा साजशृंगार केलेला असल्याने ही मनीमाऊ भलतीच ‘क्यूट’ दिसत आहे. तिच्या नाकात खड्यांची नथ, गळ्यात ठुशी आणि कपाळावर चंद्रकोरीची टिकली आहे. हा साजश्रृंगार करूनही ती बावरलेली नाही. ऐटीत बसून ती इकडे तिकडे पाहत आहे.
अर्थातच नेटकर्‍यांनी या मांजरीचे तोंड भरून कौतुक केले. अनेकांनी त्यावर भन्नाट कमेंटस्ही केल्या आहेत. ‘अगंबाई! तुम्ही पण एक किलोचा नेकलेस घातला का मनीला?’ यापासून ते ‘काजळ लावायला हवे होते, डोळे लयी भारी आहेत!’ इथपर्यंतच्या वेगवेगळ्या कमेंटस् या व्हिडीओला मिळालेल्या आहेत.
Latest Marathi News मनीमाऊचा मराठमोळा श्रृंगार! Brought to You By : Bharat Live News Media.