केसांनी रामरथ खेचत ‘ते’ निघाले अयोध्येला

दमोह : टी.व्ही.वर आपल्या स्टंटस्ने लोकांना थक्क करणारे व ‘दमोहचे खली’ म्हणून ओळखले जाणारे बद्री विश्वकर्मा यांनी अयोध्येला जाण्यासाठी आपली रामरथ यात्रा गुरुवारी सुरू केली. आपल्या केसांनी हा रथ खेचत ते मध्य प्रदेशच्या बटियागढपासून अयोध्येपर्यंत जाणार आहेत. हे अंतर 501 किलोमीटरचे असून ते अकरा दिवसांमध्ये पार केले जाईल. अयोध्येमध्ये उभ्या राहिलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा लोकार्पण … The post केसांनी रामरथ खेचत ‘ते’ निघाले अयोध्येला appeared first on पुढारी.

केसांनी रामरथ खेचत ‘ते’ निघाले अयोध्येला

दमोह : टी.व्ही.वर आपल्या स्टंटस्ने लोकांना थक्क करणारे व ‘दमोहचे खली’ म्हणून ओळखले जाणारे बद्री विश्वकर्मा यांनी अयोध्येला जाण्यासाठी आपली रामरथ यात्रा गुरुवारी सुरू केली. आपल्या केसांनी हा रथ खेचत ते मध्य प्रदेशच्या बटियागढपासून अयोध्येपर्यंत जाणार आहेत. हे अंतर 501 किलोमीटरचे असून ते अकरा दिवसांमध्ये पार केले जाईल.
अयोध्येमध्ये उभ्या राहिलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा लोकार्पण व रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त अवघा देश आता ‘राममय’ झालेला आहे. त्यानिमित्त अनेक भाविक आपापले काही ‘हट के’ योगदानही देत आहेत. अशाच एका भाविकाने बनवलेली 108 फूट लांबीची अगरबत्ती आता अयोध्येत पोहोचलीही आहे. ही अगरबत्ती प्रज्वलित केल्यावर ती दीड महिना जळत राहू शकते. एखाद्या मशालीसारखी पेटवून ठेवली तर 21 दिवसांपेक्षा अधिक काळ ती पेटती राहू शकते.
आता बद्री यांनी केसांनी रामरथ खेचत अयोध्येला जाण्याचा प्रवास सुरू केला आहे. त्यांनी वीस वर्षांपूर्वीच याबाबतचा संकल्प केला होता. ज्यावेळी अयोध्येत राममंदिर होईल त्यावेळी आपण अयोध्येपर्यंत केसांनी रामरथ खेचत नेऊ असा संकल्प त्यांनी वीस वर्षांपूर्वी केला होता. आता 22 जानेवारीला रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना असल्याने त्यांनी 11 जानेवारीपासून ही रथयात्रा सुरू केलेली आहे. बटियागढच्या श्रीराम मंदिरापासून त्यांनी हा प्रवास सुरू केला. ते रोज 50 ते 60 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. रात्रीचा मुक्काम करून रोज सकाळी ते आपली ही यात्रा सुरू करतील.
Latest Marathi News केसांनी रामरथ खेचत ‘ते’ निघाले अयोध्येला Brought to You By : Bharat Live News Media.