ब्रुनेईच्या श्रीमंत सुलतानाच्या मुलाचे सामान्य मुलीशी लग्न

लंडन : ब्रुनेईच्या सुलतानाची श्रीमंती जगाला दीपवणारीच आहे. त्यांचा महाल, जेट, आलिशान मोटारींचा ताफा…सर्व गोष्टींची जगभरात चर्चा होत असते. ब्रुनेई देशावर सर्वाधिक राज्य करणार्या या सुलतान हसनल बोलकियाह यांचा मुलगा प्रिन्स अब्दुल मतीन गुरुवारी विवाहबद्ध झाला. 32 वर्षांचा राजपुत्र अब्दुल मतीन याने 29 वर्षांच्या यांग मुलिया अनीशा रोस्ना या सर्वसामान्य तरुणीशी निकाह केला. हा सोहळा सेरी बेगवानमध्ये सोन्याचा घुमट असलेल्या मशिदीजवळ आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त ब्रुनेईत दहा दिवसांच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रिन्स मतीन हा सुलतानाचा दहावा मुलगा आहे. त्यामुळे ब्रुनेईचा सुलतान बनण्याच्या क्रमवारीत तो बराच मागे आहे. त्याची पत्नी ही फॅशन व टुरिझम व्यवसायाची मालकीण असल्याचे सांगण्यात येते. यांगचे आजोबा हे मतीनच्या वडिलांचे प्रमुख सल्लागार होते. मतीन हा प्रशिक्षित हेलिकॉप्टर पायलट आहे. प्रसारमाध्यमांमधून त्याची तुलना ब्रिटनच्या प्रिन्स हॅरीशी केली जाते. सोशल मीडियावर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. शाही विवाह सोहळ्याच्या आनंदोत्सवासाठी 1788 खोल्या असलेल्या महालात एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Latest Marathi News ब्रुनेईच्या श्रीमंत सुलतानाच्या मुलाचे सामान्य मुलीशी लग्न Brought to You By : Bharat Live News Media.
