आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम पाहायला मिळणार आहे. १३ जानेवारी रोजी, दुपारी १२ वाजता माहिम येथील सिटीलाईट सिनेमा येथे नाट्य माहितीपटाचे खास स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या `मुक्तिसंग्राम: कथा मराठवाड्याच्या संघर्षाची’ या नाट्य माहितीपटाची निर्मिती सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती आहे. त्यानिमित्ताने मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम प्रथमच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
संबंधित बातम्या –
Actress Makar Sankrant : या अभिनेत्रींची लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत तर…
तुझेच मी गीत गात आहे मालिकेत लावणी सम्राज्ञी माया जाधव यांची एन्ट्री
Kunya Rajachi Ga Tu Rani : मंगळसूत्र कोणाचं?; गोळी लागलेली गुंजा काय देणार उत्तर
निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाड्याच्या मुक्तिसाठी लढा देणाऱ्या शूरवीर स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाड्याच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास मांडणारा नाट्य माहितीपट आशियाई चित्रपट महोत्सवात सादर केला जाणार आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे अशा मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकारांनी या माहितीपटात भूमिका साकारली आहे.
सिलेक्टेड करस्पॉन्डन्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल, हैद्राबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा आदी पुस्तकांचा संदर्भ घेत माहितीपटाची संहिता लिहीण्यात आली आहे. राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या नाट्य माहितीपटातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केला.
Latest Marathi News आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाड्याचा मुक्तिसंग्राम Brought to You By : Bharat Live News Media.
