तेरवाड बंधार्‍यावर प्रदूषण नियंत्रण अधिकार्‍याला पाजले दूषित पाणी

कुरूंदवाड, पुढारी वृत्तसेवा : तेरवाड (ता. शिरोळ) येथे पंचगंगा नदीचे पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे तडफडत आहेत. इचलकरंजी, टाकवडे वेस येथील दोन ‘एसटीपी’ प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी पाण्याचे नमुने घेण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी सचिन हरभट यांना प्रदूषित पाणी पाजून संताप व्यक्त केला. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती … The post तेरवाड बंधार्‍यावर प्रदूषण नियंत्रण अधिकार्‍याला पाजले दूषित पाणी appeared first on पुढारी.

तेरवाड बंधार्‍यावर प्रदूषण नियंत्रण अधिकार्‍याला पाजले दूषित पाणी

कुरूंदवाड, Bharat Live News Media वृत्तसेवा : तेरवाड (ता. शिरोळ) येथे पंचगंगा नदीचे पाणी प्रचंड प्रदूषित झाले आहे. ऑक्सिजन मिळत नसल्याने मासे तडफडत आहेत. इचलकरंजी, टाकवडे वेस येथील दोन ‘एसटीपी’ प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आल्याने संतप्त शेतकर्‍यांनी पाण्याचे नमुने घेण्यासाठी आलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी सचिन हरभट यांना प्रदूषित पाणी पाजून संताप व्यक्त केला. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत कारवाई केल्याशिवाय सोडणार नाही, अशी भूमिका घेत हरभट यांना रोखले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रदूषणप्रश्नी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवून कारवाई करू, असे आश्वासन दिल्याने विभागीय अधिकारी हरभट यांना घेरावमुक्त करण्यात आले.
इचलकरंजी आणि औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेविनाच थेट नदीत सोडले जात आहे. या प्रदूषित पाण्यामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक जण आजारी पडले आहेत. जनावरांनाही निरनिराळ्या आजारांची लागण होत आहे. प्रदूषित पाण्याने कॅन्सरसारखे दुर्धर आजार होऊन जीवितहानी होत असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करून प्रशासन माणसे तडफडून मरायची वाट बघतेय का, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विश्वास बालिघाटे, बंडू पाटील यांच्यासह शेतकर्‍यांनी पाण्याचे नमुने घेण्यासाठी आलेल्या विभागीय अधिकारी हरभट यांना केला. आधी इचलकरंजी जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्राची तपासणी करा, असेही सुनावले. दरम्यान, इचलकरंजीत तपासणी केली असता, दोन शुद्धीकरण प्रकल्प बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतप्त शेतकर्‍यांनी मनपा अधिकारी बाजीराव कांबळे यांना बोलावून घेत त्यांच्यावरही प्रश्नांचा भडिमार केला.
कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन महापालिकांच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचा वीजपुरवठा बंद केल्याशिवाय आणि कारवाई केल्याशिवाय विभागीय अधिकारी हरभट यांना सोडणार नाही, अशी भूमिका घेतली.
यावेळी बाबुराव कोईक, आप्पासाहेब चौगुले, सुहास कोळी, सागर पाटील, अभय आलासे, अरविंद सासणे, गोरख सासणे, सुनील सासणे, शंकर सासणे, रवींद्र सासणे, उमेश चिंचवाडेंसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Latest Marathi News तेरवाड बंधार्‍यावर प्रदूषण नियंत्रण अधिकार्‍याला पाजले दूषित पाणी Brought to You By : Bharat Live News Media.