ब्रिटनमध्ये निपाह लसीची पहिली मानवी चाचणी

लंडन : निपाह विषाणूविरुद्ध ब्रिटनमध्ये एक लस विकसित करण्यात आली असून तिची मानवावरील पहिली चाचणी आता सुरू झाली आहे. आस्ट्राझेनेका फार्मा आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीच्या कोरोना लसीसाठी वापरल्या गेलेल्या तंत्रावर आधारितच ही लस आहे. निपाह विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण 25 वर्षांपूर्वी सर्वप्रथम मलेशियात आढळला होता. त्यानंतर बांगलादेश, भारत आणि सिंगापूरमध्ये त्याचे अनेक … The post ब्रिटनमध्ये निपाह लसीची पहिली मानवी चाचणी appeared first on पुढारी.

ब्रिटनमध्ये निपाह लसीची पहिली मानवी चाचणी

लंडन : निपाह विषाणूविरुद्ध ब्रिटनमध्ये एक लस विकसित करण्यात आली असून तिची मानवावरील पहिली चाचणी आता सुरू झाली आहे. आस्ट्राझेनेका फार्मा आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कंपनीच्या कोरोना लसीसाठी वापरल्या गेलेल्या तंत्रावर आधारितच ही लस आहे.
निपाह विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण 25 वर्षांपूर्वी सर्वप्रथम मलेशियात आढळला होता. त्यानंतर बांगलादेश, भारत आणि सिंगापूरमध्ये त्याचे अनेक रुग्ण आढळले होते. आता या विषाणूविरुद्ध मानवी लसीच्या चाचणीत अठरा ते 55 वर्षे वयोगटातील 52 जण सहभागी झाले आहेत, असे विद्यापीठाच्या महामारी विज्ञान संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले. निपाह विषाणूमध्ये महामारीची क्षमता आहे. आम्ही घेत असलेल्या लसीची चाचणी ही या विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी साधनांचा संच तयार करण्याच्या प्रयत्नांमध्ये एक पाऊल पुढे आहे, असे डॉ. इन-क्यू यून यांनी सांगितले.
केम्ब्रिज येथील फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपनी ‘मॉडर्ना’ने 2022 मध्ये यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जीच्या सहकार्याने निपाह विषाणू लसीची चाचणीही सुरू केली होती. भारतात केरळ राज्यात 2023 मध्ये निपाहचे सहा रुग्ण आढळले होते. त्यापैकी दोघांचा उपचारावेळी मृत्यू झाला होता. निपाहचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसेच मेंदूला सूज येण्याची शक्यता असते. निपाह संसर्ग झालेल्या व्यक्तीस मृत्यूचा धोका 40 ते 75 टक्के असतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीत म्हटले आहे.
Latest Marathi News ब्रिटनमध्ये निपाह लसीची पहिली मानवी चाचणी Brought to You By : Bharat Live News Media.