कालव्याद्वारे सिंचनासाठी एक आवर्तन : चंद्रकांत पाटील

सोलापूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : 11 जानेवारी ते 11 फेब्रुवारी या कालावधीत उजनीतून कालव्याद्वारे शेतीसाठी एक सिंचन आवर्तन देण्यात यावे तसेच पिण्यासाठी पाणी पुरविण्यास प्राधान्य देऊन उपलब्ध पाण्याचे अत्यंत सूक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले.
उजनी प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील शासकीय विश्रामगृहात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार राजेंद्र राऊत, यशवंत माने, संजय शिंदे, समाधान आवताडे, रणजीतसिंह मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता एच. टी. धुमाळ, अधीक्षक अभियंता धीरज साळे उपस्थित होते.
गतवर्षी पाऊस कमी झाला असून उपलब्ध पाणी येणार्या पावसाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी सिंचन विभागाने नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी पिण्याचे पाणी पुरविण्यास प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना केली. यापूर्वी कालवा सल्लागार समितीने मंजुरी दिल्याप्रमाणे पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन संबधितांनी केले नसल्यास त्यासंदर्भात जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून चौकशी करण्यात येईल. आवश्यकतेनुसार आढावा घेऊन कालवा सल्लागार समितीची पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे सांगितले.
उजनी प्रकल्पात सध्या 5.34 टीएमसी (9.58 टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. उजनी-भीमा प्रकल्पाद्वारे 2022-23 मध्ये प्रत्यक्ष भिजलेले क्षेत्र दोन लाख 54 हजार 253 हेक्टर (84.50 टक्के) होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी समान पध्दतीने उपलब्ध पाणी वाटप करण्याची सूचना यावेळी केली. आमदार बबनराव शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, कृष्णा खेोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक कपोले हे ऑनलाईन सहभागी झाले.
साळे यांनी उपलब्ध पाणीसाठा, कालव्यावरील आठमाही प्रकल्पीय पीक रचना, निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र, मागील पाच वर्षार्ंतील पाणीपट्टी वसुली, खरीप व रब्बी हंगाम 2023-24 मधील प्रत्यक्ष पाणी वापर, उर्वरित कालावधीसाठी पाण्याचे नियोजनाविषयीची माहिती दिली.
Latest Marathi News कालव्याद्वारे सिंचनासाठी एक आवर्तन : चंद्रकांत पाटील Brought to You By : Bharat Live News Media.
