अखेर पीएच.डी. फेलोशिपच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे दिल्या जाणार्‍या पीएच.डी. फेलोशीपसाठी बुधवारी झालेल्या चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला स्थगिती देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने जाहीर केला. मात्र, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली असून, प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप पूर्णतः निराधार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले. पीएच.डी. फेलोशीपसाठी संयुक्त चाळणी … The post अखेर पीएच.डी. फेलोशिपच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित appeared first on पुढारी.

अखेर पीएच.डी. फेलोशिपच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : सारथी, बार्टी, महाज्योती यांच्यातर्फे दिल्या जाणार्‍या पीएच.डी. फेलोशीपसाठी बुधवारी झालेल्या चाळणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाला स्थगिती देण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने जाहीर केला. मात्र, संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सर्व परीक्षा केंद्रांवर अत्यंत पारदर्शकपणे पार पाडली असून, प्रश्नपत्रिका फुटल्याचे आरोप पूर्णतः निराधार असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले. पीएच.डी. फेलोशीपसाठी संयुक्त चाळणी परीक्षा विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे बुधवारी (दि.10) सकाळी दहा ते एक या वेळेत पुणे, कोल्हापूर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांतील परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
परंतु, या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप परीक्षार्थ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक प्रा. बी. बी. कापडणीस यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनास स्थगिती दिल्याचा निर्णय जाहीर केला. परीक्षेसाठी ए, बी, सी, डी अशा चार प्रश्नपत्रिका संचांची छपाई करण्यात आली होती. या प्रश्नपत्रिका संचांची छपाई दोन मुद्रणालयांकडून गोपनीयरित्या करून घेण्यात आल्याने छपाई करण्याच्या स्वरुपामध्ये बदल असू शकतो.
गोपनीय पद्धतीने आणि विहित सुरक्षा मानकांचे पालन करून छपाई केलेले संच परीक्षा केंद्रांवर सीलबंद स्वरुपात पोहोचवण्यात आले. प्रश्नपत्रिका संच सी आणि डीमधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचनेमधील सूचना क्र. 3 (3) मध्ये प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर लावलेले सील उघडावे, सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारू नये, असे नमूद केले होते.
हेही वाचा

निकालाचे इंग्रजीमध्ये वाचन करणे दुर्दैवी : जयंत पाटील
चिन्मय खून प्रकरण : शांत, निर्विकार ‘सूचना’ आणि ते 16 तास
गृहनिर्माण क्षेत्र : राज्यात झाली महागृहप्रकल्प पूर्ती!

Latest Marathi News अखेर पीएच.डी. फेलोशिपच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन स्थगित Brought to You By : Bharat Live News Media.