कोकणपट्ट्यातील सुमारे 2 हजार कोटींच्या विकासकामांना मंजुरी

दापोली; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकणाला जवळपास 2 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. मंत्री चव्हाण यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील जालगाव येथे अर्थसंकल्पामधील मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केदार साठे, संजय सावंत यांच्यासह नागरिक उपस्थित … The post कोकणपट्ट्यातील सुमारे 2 हजार कोटींच्या विकासकामांना मंजुरी appeared first on पुढारी.

कोकणपट्ट्यातील सुमारे 2 हजार कोटींच्या विकासकामांना मंजुरी

दापोली; Bharat Live News Media वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून कोकणाला जवळपास 2 हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील काही कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
मंत्री चव्हाण यांच्या हस्ते दापोली तालुक्यातील जालगाव येथे अर्थसंकल्पामधील मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केदार साठे, संजय सावंत यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मंत्री चव्हाण म्हणाले, जिल्ह्याला शासनाच्या माध्यमातून भरीव निधी देण्यात आलेला आहे. शासनाच्या विविध योजना आहेत, त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या शासनाच्या काळात सर्वांगीण विकास झाला पाहिजे. त्याद़ृष्टीने विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. प्रलंबित विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी हाती घेण्यात आले आहेत. आंबेत पुलाची दुरुस्ती यासारखी जी कामे प्रलंबित होती, त्यांना न्याय देण्याचे काम केले आहे. अर्थसंकल्पामध्ये कामाचा स्कोप बघून आवश्यक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

Latest Marathi News कोकणपट्ट्यातील सुमारे 2 हजार कोटींच्या विकासकामांना मंजुरी Brought to You By : Bharat Live News Media.