भरत येशाळ खून : तेलंगणातून तिघांना अटक

हातकणंगले, पुढारी वृत्तसेवा : ट्रक दुरुस्त करणार्‍या भरत पांडुरंग येशाळ (वय 38, रा. रेणुकानगर झोपडपट्टी, इचलकरंजी) या मिस्त्रीला गाडी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने बोलावून खून केल्या प्रकरणी तेलंगणा राज्यातील मिरियाला यादगिरी महेश (वय 26), मोहमद अमीर महंमद शरीफ खान (24, दोघे रा. श्रीराम कॉलनी, सायबराबाद, हैद्राबाद, तेलंगणा) व गजूला सत्यनारायण शिवशंकर (27) या तिघांना अटक करण्यात … The post भरत येशाळ खून : तेलंगणातून तिघांना अटक appeared first on पुढारी.

भरत येशाळ खून : तेलंगणातून तिघांना अटक

हातकणंगले, Bharat Live News Media वृत्तसेवा : ट्रक दुरुस्त करणार्‍या भरत पांडुरंग येशाळ (वय 38, रा. रेणुकानगर झोपडपट्टी, इचलकरंजी) या मिस्त्रीला गाडी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने बोलावून खून केल्या प्रकरणी तेलंगणा राज्यातील मिरियाला यादगिरी महेश (वय 26), मोहमद अमीर महंमद शरीफ खान (24, दोघे रा. श्रीराम कॉलनी, सायबराबाद, हैद्राबाद, तेलंगणा) व गजूला सत्यनारायण शिवशंकर (27) या तिघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले.
सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे पथकाने तेलंगणा राज्यात जाऊन सापळा रचून संशयितांना अटक केली. मुख्य संशयित मिरियाला महेश याचे येसाळे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. याची माहिती भरत येसाळे याला लागल्याने तो पत्नीस मारहाण करत होता.
याच कारणावरून त्याचा खून केल्याची कबुली संशयितांनी दिली. संशयितांना हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, निकेश खाटमोडे-पाटील, उपअधीक्षक रोहिणी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत निशाणदार व सहकार्‍यांनी केली.
येशाळ कुटुंब मूळचे तेलंगणातील
मृत भारत येशाळ यांचे वडील बर्‍याच वर्षांपूर्वी तेलंगणावरून इचलकरंजी येथे कामासाठी आले होते काही वर्षांपूर्वी भरत याचा विवाह तेलंगणा येथील मुलीशी झाला. यातूनच मुलीचे व संशयिताचे अनैतिक संबंध निर्माण झाले होते. भरतला तीन अपत्ये आहेत.
Latest Marathi News भरत येशाळ खून : तेलंगणातून तिघांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.