हवेतील गारवा घटला, किमान तापमान वाढले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईतून थंडी गायब झाली असून किमान तापमानात वाढ झाली आहे. आयएमडीच्या सांताक्रुझ केंद्रामध्ये गुरुवारी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. यामुळे थंडीपासून मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai) मंगळवारी रात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा वाढला. किमान तापमानात घट झाली होती. मात्र हवामानातील हा बदल तात्पुरता ठरला. बुधवारपासून किमान तापमान … The post हवेतील गारवा घटला, किमान तापमान वाढले appeared first on पुढारी.

हवेतील गारवा घटला, किमान तापमान वाढले

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : मुंबईतून थंडी गायब झाली असून किमान तापमानात वाढ झाली आहे. आयएमडीच्या सांताक्रुझ केंद्रामध्ये गुरुवारी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. यामुळे थंडीपासून मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai)
मंगळवारी रात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा वाढला. किमान तापमानात घट झाली होती. मात्र हवामानातील हा बदल तात्पुरता ठरला. बुधवारपासून किमान तापमान २१ अंश सेल्सिअसवर गेले. गुरुवारी त्यात एका अंश सेल्सिअसने वाढ झाली तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस इतके होते.
तापमानात थोडी घट होणार
उद्या शुक्रवारी आणि शनिवारी किमान तापमानात थोडी घट होऊन अनुक्रमे २१ आणि २० अंश सेल्सिअस इतके असेल. यावेळी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. थंड आणि गरम हवामान असले तरी पुढील आठवडाभर मुंबई शहर व उपनगरांत ढगाळ वातावरण राहील.
वरळी, विलेपार्लेत प्रदूषणात वाढ
■ सिद्धार्थनगर-वरळीसह (एक्यूआय-१८७) विलेपार्ले (१८२) येथे गुरुव- ारी वायू प्रदूषणात वाढ दिसून आली. हवा गुणवत्ता निर्देशांकाची (एक्यूआय) ही पातळी खराब श्रेणीत मोडते. नेव्हीनगर, कुलाबा (१७७), मालाड (१७६) आणि माझगाव (१७५) येथील वायू प्रदूषण अतिखराब श्रेणीच्या दिशेने वाटचाल करत आहे.
Latest Marathi News हवेतील गारवा घटला, किमान तापमान वाढले Brought to You By : Bharat Live News Media.