उमरगा-लातूर महामार्गावर भरधाव कारची मोटरसायकलला धडक, एक ठार

औसा, Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील चलबुर्गा पाटी नजीक उमरगा-लातूर महामार्गावर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ भरधाव कारने मोटरसायकलला पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकल वरील युवक जागीच ठार झाला असून आणि एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी लातूरला हलविण्यातआले आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की आज सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल क्रमांक एम एच 24 1419 या दुचाकी वरून लातूर कडे जाणाऱ्या कुलदीप सूर्यवंशी यांच्यासह एकजण जात असताना त्यांना एम एच 14 पी एस 6999 या भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मोटरसायकलला जोराची धडक दिल्यामुळे
पाठीमागे बसलेला शिवकुमार अशोक कांबळे (वय 22 वर्ष ) रा पानचिंचोली तालुका निलंगा येथील युवक जागीच ठार झाला असून अन्य एकास उपचारासाठी लातूरला हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
लिफ्ट घेणे महागात पडले
लातूर येथे वाहनचालक म्हणून काम करणारा पानचिंचोली येथील युवक शिवकुमार कांबळे हा आज वेळअमावस्या असल्याने निलंगा येथे आला होता.वेळ अमावस्या असल्याने सर्व वाहने भरून जात असल्याने शिवकुमार कांबळे याने एका मोटार सायकल ला लिफ्ट मागून लातूर कडे येत होता पण लामजना पाटीच्या पुढे भरधाव कार ने पाठीमागून जोराची धडक दिल्याने लिफ्ट घेणाऱ्या कांबळे चा दुर्दैवी मृत्यू झाला.
Latest Marathi News उमरगा-लातूर महामार्गावर भरधाव कारची मोटरसायकलला धडक, एक ठार Brought to You By : Bharat Live News Media.
