बीड : संतापजनक घटना; परळीत तीन ते चार दिवसाचे नवजात स्त्री अर्भक सापडले

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : परळीत गेल्या चार दिवसांपूर्वीच सहा महिन्याची मुलगी एका पिशवीत बांधून फेकून दिल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवजात तीन ते चार दिवस वयोमान असलेली मुलगी बेवारस अवस्थेत सापडली आहे. या संतापजनक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. परळी शहरापासून जवळच असलेल्या नंदागौळ रस्त्यावर बेवारस अवस्थेत नवजात … The post बीड : संतापजनक घटना; परळीत तीन ते चार दिवसाचे नवजात स्त्री अर्भक सापडले appeared first on पुढारी.

बीड : संतापजनक घटना; परळीत तीन ते चार दिवसाचे नवजात स्त्री अर्भक सापडले

परळी वैजनाथ; Bharat Live News Media वृत्तसेवा : परळीत गेल्या चार दिवसांपूर्वीच सहा महिन्याची मुलगी एका पिशवीत बांधून फेकून दिल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवजात तीन ते चार दिवस वयोमान असलेली मुलगी बेवारस अवस्थेत सापडली आहे. या संतापजनक घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
परळी शहरापासून जवळच असलेल्या नंदागौळ रस्त्यावर बेवारस अवस्थेत नवजात अर्भक फेकून दिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून घटनास्थळी पोलीस दाखल झाले. या बेवारस अर्भकास उपजिल्हा रुग्णालय परळी येथे आणण्यात आले. स्त्री जातीचे हे अर्भक असून चार ते पाच दिवसाचे वय असावे असा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. दरम्यान चारच दिवसांपूर्वी अशाच प्रकारची एक घटना परळीच्या मालेवाडी रस्त्यावर घडली होती. पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. श्री झांबरे व त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ या नवजात अर्भकास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या बाळावर उपजिल्हा रुग्णालय परळी येथे सध्या उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
Latest Marathi News बीड : संतापजनक घटना; परळीत तीन ते चार दिवसाचे नवजात स्त्री अर्भक सापडले Brought to You By : Bharat Live News Media.