गोंदियात माजी नगरसेवकावर गोळीबार

गोंदिया; Bharat Live News Media वृत्तसेवा : माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते व उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांचे बंधू लोकेश उर्फ कल्लू यादव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी देशी कट्ट्यातून गोळीबार केला. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना आज 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शहरातील यादव चौक येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार, लोकेश यादव हे यादव चौकातीलच तलाव काठावरील मंदिरातून पूजापाठ करून घरी येत असताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी मागेहून देशी कट्ट्यातून यादव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या कमरेला लागली. जखमी अवस्थेत त्यांना स्थानिक केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. हल्ला जुन्या वैमनश्यातून केल्याचे सांगितले जाते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेने शहरात तणावपूर्ण शांतता आहे. यादव चौकात पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पोलिस आरोपीच्या शोध घेत आहेत.
Latest Marathi News गोंदियात माजी नगरसेवकावर गोळीबार Brought to You By : Bharat Live News Media.
