गोव्यात बाणावली येथे विदेशी माहिला पर्यटकावर बैलाचा हल्ला

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : बाणावली समुद्र किनार्‍यावर उधळलेल्या बैलाने महिला पर्यटकावर जीवघेणा हल्ला केला. ही पर्यटक महिला गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. जखमी पर्यटक महिलेचे नाव युवोनी मोरिष (वय 79) असे असून ती इंग्लंडची नागरिक आहे. बैलाने तिच्या मांडीत शिंग खुपसून तिला जमिनीवर आपटले. त्यामुळे तिच्या डोक्यालाही … The post गोव्यात बाणावली येथे विदेशी माहिला पर्यटकावर बैलाचा हल्ला appeared first on पुढारी.

गोव्यात बाणावली येथे विदेशी माहिला पर्यटकावर बैलाचा हल्ला

मडगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : बाणावली समुद्र किनार्‍यावर उधळलेल्या बैलाने महिला पर्यटकावर जीवघेणा हल्ला केला. ही पर्यटक महिला गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
जखमी पर्यटक महिलेचे नाव युवोनी मोरिष (वय 79) असे असून ती इंग्लंडची नागरिक आहे. बैलाने तिच्या मांडीत शिंग खुपसून तिला जमिनीवर आपटले. त्यामुळे तिच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.
युवोनी आपल्या इतर सहकार्‍यांसोबत समुद्रस्नानासाठी बाणावली किनार्‍यावर आली होती. तिथेच काही गुरे फिरत होती. त्यातील एका बैल उधळला आणि त्याने समोरून चालत येणार्‍या ईवाब याच्यावर हल्ला केला. अचानक बैल चाल करून आल्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांनी तेथून पळ काढला. मात्र, युवोनी हिला पळता आले नाही. उधळलेल्या बैलाने तिच्यावर हल्ला केला.
बैल पुन्हा तिच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होता मात्र तिच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केल्यामुळे बैलाने धूम ठोकली. किनार्‍यावरील सुरक्षा रक्षकांनी तिला स्ट्रेचरवरून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केेले आहेे.
Latest Marathi News गोव्यात बाणावली येथे विदेशी माहिला पर्यटकावर बैलाचा हल्ला Brought to You By : Bharat Live News Media.