तुम्‍ही म्‍हणाल तर विमानावरही नाचतो, शाहरुखचे मणिरत्‍नम यांना साकडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्लॉकबस्टर ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ( Shahrukh Khan )  आता ‘डंकी’ यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. सध्या ‘डंकी’ मधील शाहरूखच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केलं जात आहे. दुसरीकडे याचवर्षी त्याच्या आणखी तीन नवीन चित्रपटांची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शाहरूखने ‘दिल से’ फेम दिग्दर्शक मणिरत्नम … The post तुम्‍ही म्‍हणाल तर विमानावरही नाचतो, शाहरुखचे मणिरत्‍नम यांना साकडे appeared first on पुढारी.

तुम्‍ही म्‍हणाल तर विमानावरही नाचतो, शाहरुखचे मणिरत्‍नम यांना साकडे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ब्लॉकबस्टर ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपटानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ( Shahrukh Khan )  आता ‘डंकी’ यशाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे. सध्या ‘डंकी’ मधील शाहरूखच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केलं जात आहे. दुसरीकडे याचवर्षी त्याच्या आणखी तीन नवीन चित्रपटांची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान शाहरूखने ‘दिल से’ फेम दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत आणखी एक चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली. या चित्रपटासाठी त्याने ”दिल से’ साठी चालत्या रेल्वेवर डान्स केला होता आता या चित्रपटासाठी विमानावरही नाचतो’ अशी इच्छा व्यक्त केली आहे.
संबंधित बातम्या 

Vamika Birthday : अनुष्का-विराट लाडली तीन वर्षाची मात्र, अजूनही लपवलाय चेहरा; कारण आलं समोर
Prabhu Shree Ram Song : आदर्श शिंदेच्या दमदार आवाजातील ‘प्रभू श्रीराम’ सुंदर गाण्याची निर्मिती
Shahrukh Khan : शाहरुख खान सुहानासमवेत शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनाला (Video)

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान अभिनेता शाहरुख खान ( Shahrukh Khan ) आणि ‘दिल से’ चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्नम यांची भेट झाली. या भेटीदरम्यान शाहरूखने पुन्हा एकदा त्याच्यासोबत चित्रपट बनवण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. यात शाहरूखने म्हटलं की, ‘याआधी मी तुमच्यासोबत ‘दिल से’ चित्रपट केला. यातील ‘छैया-छैया’ या गाण्यावर धमाल उडवलीय. या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांच्यात पाहायला मिळत आहे. दरम्यान मला या चित्रपटात चालत्या रेल्वेच्या डब्यावर डान्स करावा लागला होता. आता तुम्ही म्हणत असाल तर, मी विमानावर सुद्धा डान्स करू शकतो. फक्त मला यांची संधी द्यावी. मला तुमच्यासोबत काम करण्याची खूपच इच्छा आहे’. असे त्याने म्हटलं आहे.
याच दरम्यान शाहरुखच्या या विनंतीला उत्तर देताना मणिरत्नम यांनी गंमतीने म्हटलं आहे की, ‘शाहरूख जेव्हा विमान खरेदी करेल तेव्हा तो त्याच्या चित्रपटात कास्ट करेल’. यानंतर पुन्हा शाहरूखने माझे चित्रपट हिट होत असतात हे तुम्ही पाहिले असल्याचेही म्हटलं आहे.
ही मुलाखत सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांनी खरोखरंच पुन्हा एकत्रित चित्रपट साईन करावा असे कॉमेन्टस करताना म्हटलं आहे. शाहरुख खान आणि मणिरत्नम यांनी १९९८ मध्ये ‘दिल से’ या चित्रपटासाठी पहिल्यांदा एकत्र पडद्यावर काम केले होतं. त्यावेळी हा चित्रपट हिट झाला होता.

 

View this post on Instagram

 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

View this post on Instagram

 
A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

Latest Marathi News तुम्‍ही म्‍हणाल तर विमानावरही नाचतो, शाहरुखचे मणिरत्‍नम यांना साकडे Brought to You By : Bharat Live News Media.