Nagar : अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या घरांवर नोटिसा

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी कर्मचारी संपावर असून संगमनेर प्रकल्प कार्यालयाने नवीन मदतनीस आणि कर्मचार्‍यांना नोटिसा बजावल्या असून अनेकांच्या घरावर नोटिसा चिटकवल्या. या विरोधात आंदोलनाची भूमिका घेत नोटिसा मागे घेण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला. कर्मचारी सभेच्या वतीने अध्यक्ष भारती धरत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालय प्रांगणात झालेल्या … The post Nagar : अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या घरांवर नोटिसा appeared first on पुढारी.

Nagar : अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या घरांवर नोटिसा

संगमनेर शहर : Bharat Live News Media वृत्तसेवा : अंगणवाडी कर्मचारी संपावर असून संगमनेर प्रकल्प कार्यालयाने नवीन मदतनीस आणि कर्मचार्‍यांना नोटिसा बजावल्या असून अनेकांच्या घरावर नोटिसा चिटकवल्या. या विरोधात आंदोलनाची भूमिका घेत नोटिसा मागे घेण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने पंचायत समितीवर मोर्चा काढण्यात आला. कर्मचारी सभेच्या वतीने अध्यक्ष भारती धरत यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालय प्रांगणात झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. निशा शिवूरकर, अनिता नवले, प्रमिला धनराज, प्रतिभा पडघलमल, रेखा सातपुते, आशा खरात, संगीता बोडके, मंदा गायकवाड, आरती पावर, साथी शांताराम गोसावी आदी उपस्थित होत्या.
शिवूरकर म्हणाल्या, अंगणवाडी कर्मचारी आपल्या हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. कर्मचारी कायदेशीर मार्गाने संप करत आहेत. त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांच्या घरावर नोटिसा चिकटविणे नोटिसा बेकायदेशीर आहे. ही घर त्यांच्या नावावर नाहीत. या नोटिसांमुळे त्यांना कौटुंबिक तणावांचा सामना करावा लागणार आहे. या नोटिसांमुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. तरी या नोटिसा त्वरित मागे घ्याव्यात. अन्यथा नोटिसा चिकटविणार्‍या कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. संगमनेर प्रकल्प कार्यालयाने नवीन मदतनीस आणि कर्मचार्‍यांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. आंदोलनात सुनंदा राहणे, इंदुमती घुले, मंदा ठोंबरे, सोनाली पवार, शबाना शेख आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
 
Latest Marathi News Nagar : अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या घरांवर नोटिसा Brought to You By : Bharat Live News Media.