Nagar : पाटपाण्यासाठी चेकेवाडीत सर्वेक्षणास प्रारंभ

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील दुष्काळी पट्ट्याला कायमस्वरूपी पाटपाणी मिळण्यासाठी प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांनी जलक्राती अभियान सुरू केले आहे. या कामाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील माणिकदौंडी या डोंगर परिसरातील चेकेवाडी गावात सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर,आजीनाथ महाराज आंधळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नवनाथ चव्हाण, … The post Nagar : पाटपाण्यासाठी चेकेवाडीत सर्वेक्षणास प्रारंभ appeared first on पुढारी.

Nagar : पाटपाण्यासाठी चेकेवाडीत सर्वेक्षणास प्रारंभ

पाथर्डी तालुका : Bharat Live News Media वृत्तसेवा :  तालुक्यातील दुष्काळी पट्ट्याला कायमस्वरूपी पाटपाणी मिळण्यासाठी प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांनी जलक्राती अभियान सुरू केले आहे. या कामाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील माणिकदौंडी या डोंगर परिसरातील चेकेवाडी गावात सर्वेक्षणाला सुरूवात करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर,आजीनाथ महाराज आंधळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नवनाथ चव्हाण, शहामंद पठाण, आलमगीर पठाण, समिर पठाण, सतीश आठारे आदी उपस्थित होते.
तालुक्यातील 107 ग्रामपंचायतींपैकी 90 ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या वाड्या-वस्त्यांवर हे पाणी पोहोचण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. आडगाव, राघू हिवरे, लोहसर, चितळी, पाडळी, तिसगाव, निवडुंगे, पागोरी पिंपळगाव, खर्डे आदी गावात सर्वेक्षण पूर्ण झाले. आता माणिकदौंडी परिसरात सर्वेक्षण केले जात आहे. तालुक्याची दुष्काळी ओळख पुसण्यासाठी गोदावरी कृष्णा खोर्‍याच्या माध्यमातून पाणी मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील.
त्यासाठी दिलीप खेडकर व त्यांच्या सहकार्‍यांनी कंबर कसली आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्वेक्षण पूर्ण होईल. त्याचा शासनाकडे सुपूर्त केली जाणार आहे. वेळ प्रसंगी न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे खेडकर यांनी सांगितले. तालुक्यातील एकशे दहा ते पंधरा गावांमधून चारी जाणार असून, त्याद्वारे पाणी सोडले जाणार आहे. खेडकर यांच्याबरोबर माजी सभापती संभाजी पालवे, आजीनाथ महाराज आंधळे, माजी पंचायत समिती सदस्य भगवान आव्हाड उपस्थित होते.
Latest Marathi News Nagar : पाटपाण्यासाठी चेकेवाडीत सर्वेक्षणास प्रारंभ Brought to You By : Bharat Live News Media.