Nagar : श्रीगोंद्यात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. शहराच्या अनेक भागात बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. एवढेच नव्हे, तर पोलिस ठाण्यासमोरील आवारातही वाहने बेशिस्तरित्या पार्किंग केली जात आहे. या वाहनावर कारवाई केली जात नाही, हे विशेष. नगर-दौंड, जामखेड-शिक्रापूर महामार्गासह अन्य रस्त्यांवरही सतत अपघात होत आहेत. बहुतांश अपघातांमध्ये चालकांची बेपर्वाई … The post Nagar : श्रीगोंद्यात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी appeared first on पुढारी.

Nagar : श्रीगोंद्यात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी

श्रीगोंदा : Bharat Live News Media वृत्तसेवा : बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. शहराच्या अनेक भागात बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. एवढेच नव्हे, तर पोलिस ठाण्यासमोरील आवारातही वाहने बेशिस्तरित्या पार्किंग केली जात आहे. या वाहनावर कारवाई केली जात नाही, हे विशेष. नगर-दौंड, जामखेड-शिक्रापूर महामार्गासह अन्य रस्त्यांवरही सतत अपघात होत आहेत. बहुतांश अपघातांमध्ये चालकांची बेपर्वाई आणि बेशिस्त हीच कारणे समोर येतात. या अपघातांमध्ये कित्येकांना प्राण गमवावे लागले आहेत. महामार्ग आणि स्थानिक पोलिस दोन्हीही अपघात रोखण्यात पूर्णतः अपयशी ठरले आहेत. या दोन्हीही खात्यांनी अपघात रोखण्यासाठी अथवा वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. महामार्गांवरील अपघातांची मालिका थांबायला तयार नाही. तालुक्यातील काष्टी येथील श्रीगोंदा चौकात वाहतूक कोंडी नित्याची बनली आहे. त्याकडे पोलिसांकडून कानाडोळा केला जातो.
शहरातील बेशिस्त पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. विशेषतः एका खासगी बँकेसमोर अनेक वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडी कायमची आहे. वाहनधारक सर्रास रस्त्यांच्या मधोमध दुभाजकाप्रमाणे वाहने लावून मोकळे होत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळत आहे. पोलिस ठाण्यासमोरील बेशिस्त पार्किंग नित्याची बनली आहे. पोलिसांची वाहने पोलिस ठाण्यात जाणे मुश्कील झाले तरीही पोलिस कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काल (दि.10) पोलिस ठाण्यासमोरील बेशिस्त पार्किंगबाबत काही मंडळींनी पोलिस अधिकार्‍यांकडे फोटोसह तक्रार केली. संबंधित वाहने तब्बल दोन तास रस्त्यात बेशिस्त उभी असतानाही त्यावर दोन तासांत कोणतीही कारवाई झाली नाही. तत्कालीन पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात येणार्‍या वाहनावर निर्बंध आणले होते. त्यांच्या काळात बेशिस्त वाहन पार्किंग करण्याचे कुणी धारिष्ट्य दाखवले नाही. आता मात्र प्रभारी पोलिस अधिकार्‍यांचा कुठलाच धाक राहिला नसल्याचे दिसून येते.
 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून रस्ते अपघात रोखण्याकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पोलिस ठाण्यासमोरील बेशिस्त पार्किंगवर कारवाई न करणारे पोलिस प्रशासन शहरासह तालुक्यातील वाहतुकीला काय शिस्त लावणार असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
हेही वाचा :

Pune : कोकणात जाण्यासाठी तिसरा मार्ग होणार उपलब्ध
Pune : जिल्ह्यात अनेक फार्म हाऊसचे बांधकाम बेकायदेशीर !

Latest Marathi News Nagar : श्रीगोंद्यात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी Brought to You By : Bharat Live News Media.