बेल्ह्यात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गायी, वासरांची सुटका

आळेफाटा : पुढारी वृत्तसेवा : बेल्हे (ता. जुन्नर) परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ४ गायी व तब्बल ११६ वासरांची पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिसांनी बुधवारी (दि. १०) मध्यरात्री संयुक्तपणे कारवाई करत सुटका केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एकजण पसार झाला आहे. अल्ताफ हमीद बेपारी (वय ४८), असिफ … The post बेल्ह्यात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गायी, वासरांची सुटका appeared first on पुढारी.

बेल्ह्यात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गायी, वासरांची सुटका

आळेफाटा : Bharat Live News Media वृत्तसेवा : बेल्हे (ता. जुन्नर) परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या ४ गायी व तब्बल ११६ वासरांची पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिसांनी बुधवारी (दि. १०) मध्यरात्री संयुक्तपणे कारवाई करत सुटका केली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून एकजण पसार झाला आहे. अल्ताफ हमीद बेपारी (वय ४८), असिफ शफी बेपारी (वय ३६) व अल्पेश रौफ कुरेशी (वय १९, तिघेही रा. बेल्हे, ता. जुन्नर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, तर एकजण पसार झाला आहे. बेल्हे येथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी गायी व वासरे दोरखंडाने बांधून ठेवलेली होती. त्यांनी ओरडू नये म्हणून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली होती. तसेच त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय केलेली नव्हती.
रात्री ही सर्व जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येणार असल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मि‌ळाली. त्यानुसार आळेफाटा पोलिसांच्या मदतीने पथकाने बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास छापे मारले. यावेळी ५ गायी व एकूण ११६ वासरे आढळून आली. या सर्व जनावरांची सुटका करत त्यांना आळेफाटा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर संगमनेर येथील श्री जीवदया मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट गोशाळेत त्यांची रवानगी करण्यात आली.
ही कामगिरी जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अभिजित सावंत, प्रकाश वाघमारे, तुषार पंधारे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, जनार्धन शेळके, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, संदीप वारे, अक्षय नवले, दगडू वीरकर, आळेफाटा पोलिस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलिस सुनील बडगुजर व पोलिस कर्मचारी यांच्या पथकाने केली.
हेही वाचा :

Pune : तळेगाव ढमढेरेत वाहतूक कोंडीसह अपघात वाढले
Maratha Reservation : मराठा बांधव 20 जानेवारीपासून मुंबईत येण्यास सुरुवात होणार

Latest Marathi News बेल्ह्यात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या गायी, वासरांची सुटका Brought to You By : Bharat Live News Media.