हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘हे’ ४ उपाय करा, कोलेस्‍ट्रॉल राहील नियंत्रणात

नववर्षात प्रवेश करत असताना आपल्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासह स्‍वास्‍थ्‍याला प्राधान्‍य देणारे संकल्‍प निर्धारित करण्‍यासाठी ही यथायोग्‍य वेळ आहे. निर्धारित केलेले संकल्‍प विशिष्‍ट आरोग्‍यदायी ध्‍येये संपादित करण्‍यासाठी प्रेरणास्रोत ठरतात आणि हृदयाच्‍या आरोग्‍याच्‍या बाबतीत कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्‍याला प्रथम प्राधान्‍य दिले पाहिजे. (Cholesterol) हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी आरोग्‍यदायी सुरूवात करू इच्छिता? १० पैकी ६ भारतीय उच्‍च लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन … The post हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘हे’ ४ उपाय करा, कोलेस्‍ट्रॉल राहील नियंत्रणात appeared first on पुढारी.
हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘हे’ ४ उपाय करा, कोलेस्‍ट्रॉल राहील नियंत्रणात

डॉ. झाकिया खान

नववर्षात प्रवेश करत असताना आपल्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍यासह स्‍वास्‍थ्‍याला प्राधान्‍य देणारे संकल्‍प निर्धारित करण्‍यासाठी ही यथायोग्‍य वेळ आहे. निर्धारित केलेले संकल्‍प विशिष्‍ट आरोग्‍यदायी ध्‍येये संपादित करण्‍यासाठी प्रेरणास्रोत ठरतात आणि हृदयाच्‍या आरोग्‍याच्‍या बाबतीत कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्‍याला प्रथम प्राधान्‍य दिले पाहिजे. (Cholesterol)
हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी आरोग्‍यदायी सुरूवात करू इच्छिता?
१० पैकी ६ भारतीय उच्‍च लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्‍ट्रॉल (एलडीएल-सी) किंवा ‘बॅड’ कोलेस्‍ट्रॉलने त्रस्‍त असल्‍यामुळे हृदयाच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याला अधिक प्राधान्‍य देणे महत्त्वाचे आहे. वैयक्तिक आरोग्‍यविषयक ध्‍येये भिन्‍न असू शकतात, पण संकल्‍पामध्‍ये कोलेस्‍ट्रॉल व्‍यवस्‍थापनाचा समावेश करणे हे आरोग्‍यदायी जीवनशैलीसाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे. वजन कमी करायचे असो, फिटनेसमध्‍ये सुधारणा करायची असो किंवा आहारामध्‍ये बदल करायचे असो कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवरील नियंत्रणामुळे हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होते. (Cholesterol)
मुंबईमधील फोर्टिस हॉस्पिटलच्‍या कार्डियोलॉजिस्‍ट डॉ. झाकिया खान म्‍हणाल्‍या, ”कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर देखरेख ठेवल्‍याने उच्‍च एलडीएल-सीचे लवकर निदान होण्‍यास मदत होते. आरोग्‍यविषयक स्थितीबाबत माहित नसल्‍यामुळे जवळपास २५ टक्‍के रूग्‍णांचे उच्‍च एलडीएल-सी पातळ्यांसह निदान झाले आहे. बैठेकाम करण्‍याच्‍या शैलीमुळे हा धोका वाढतो, तसेच घातक कोलेस्‍ट्रॉलचे प्रमाण वाढत हृदयविषयक आजार होण्‍याचा धोका वाढतो. नववर्ष नियमितपणे कोलेस्‍ट्रॉलची चाचणी करत आणि आपल्‍या आरोग्‍यावर देखरेख ठेवत हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याला प्राधान्‍य देण्‍यासाठी उत्तम वेळ आहे. हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍यासाठी आणि दीर्घकाळापर्यंत हृदयविषयक आजारांचा धोका कमी करण्‍यासाठी सक्रिय पावले उचलणे आवश्‍यक आहे.”
हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यासाठी साध्‍य करता येण्‍याजोगी ध्‍येये स्‍थापित करा
आरोग्‍यविषयक ध्‍येये स्‍थापित करताना ती वास्‍तविक व विशिष्‍ट असणे आवश्‍यक आहे. जीवनशैलीमध्‍ये मोठे बदल करण्‍याऐवजी साध्‍य करता येतील अशा ध्‍येयांवर लक्ष केंद्रित करा. लहान, पण सातत्‍यपूर्ण पुढाकारामुळे कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवता येऊ शकते. लक्षात ठेवण्‍याची सर्वात महत्त्वाची गोष्‍ट म्‍हणजे नियमितपणे तपासणी करणे, यामुळे कोलेस्‍ट्रॉल पातळ्या व हृदयाच्‍या आरोग्‍याबाबत बहुमूल्‍य माहिती मिळते.
नियमित व्‍यायाम आणि संतुलित आहाराचे सेवन अशा उत्तम सवयींचा कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर सकारात्‍मक परिणाम होऊ शकतो. साधे बदल देखील हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करू शकतात.
हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि कोलेस्टेरॉलचे व्यवस्थापन करण्यासाठी निरोगी संकल्पांसह उच्‍च एलडीएल-सी पातळ्या असलेल्‍या व्‍यक्‍तींकरिता शिफारस करण्‍यात आलेले काही सल्‍ले पुढे देण्‍यात आले आहेत :
1. वैयक्तिक सल्‍ल्‍यासाठी कार्डियोलॉजिस्‍टसोबत सल्‍लामसलत करा, त्‍यांच्‍या विशेष मार्गदर्शनामुळे आरोग्‍यविषयक विशिष्‍ट गरजा व धोक्‍यांसाठी कोलेस्‍ट्रॉल व्‍यवस्‍थापन योजना आखण्‍यास मदत होऊ शकते.
2. हृदयाचे आरोग्‍य उत्तम राखण्‍यास मदत करणा-या फळे, भाज्‍या व संपूर्ण धान्‍यांचा समावेश असलेल्‍या हार्ट-हेल्‍दी आहाराचे सेवन करा.
3. नियमितपणे मध्‍यम स्‍वरूपात व्‍यायाम करा, तसेच प्रासंगिक वर्कआऊटमुळे देखील कोलेस्‍ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्‍यास आणि हृदयाचे आरोग्‍य उत्तम राहण्‍यास मदत होऊ शकते.
4. तुमच्या डॉक्टरांच्या शिफारशींचे काटेकोरपणे पालन करून प्रीस्‍क्राइब करण्‍यात आलेली औषधे सातत्याने घ्या, ते कोलेस्‍ट्रॉल पातळ्यांवर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये आणि हृदयविषयक आजारांचा धोका कमी करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
तर मग, या वर्षी आपल्‍या हृदयाच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याला प्राधान्‍य द्या. संकल्‍प निर्धारित करत, कोलेस्‍ट्रॉल व्‍यवस्‍थापन समजून घेत आणि हृदयाचे आरोग्‍य उत्तम ठेवणारे परिवर्तन करत आपण भविष्‍यात आरोग्‍यदायी राहण्‍याच्‍या दिशेने वाटचाल करू शकतो.
Latest Marathi News हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘हे’ ४ उपाय करा, कोलेस्‍ट्रॉल राहील नियंत्रणात Brought to You By : Bharat Live News Media.