सेन्सेक्स, निफ्टी तेजीत बंद, मालदीव वादात Easy Trip शेअर्सची रॉकेट भरारी

पुढारी ऑनलाईन : मजबूत सुरुवातीनंतर शेअर बाजारात आज काही प्रमाणात विक्री दिसून आली. आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढले. सेन्सेक्स ६३ अंकांनी वाढून ७१,७२१ वर बंद झाला. तर निफ्टी २८ अंकांच्या किरकोळ वाढीसह २१,६४७ वर स्थिरावला. (Closing Bell) क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र कल दिसून आला. कॅपिटल गुड्स निर्देशांक १ टक्‍क्‍यांनी आणि आयटी निर्देशांक ०.५ … The post सेन्सेक्स, निफ्टी तेजीत बंद, मालदीव वादात Easy Trip शेअर्सची रॉकेट भरारी appeared first on पुढारी.

सेन्सेक्स, निफ्टी तेजीत बंद, मालदीव वादात Easy Trip शेअर्सची रॉकेट भरारी

Bharat Live News Media ऑनलाईन : मजबूत सुरुवातीनंतर शेअर बाजारात आज काही प्रमाणात विक्री दिसून आली. आजच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढले. सेन्सेक्स ६३ अंकांनी वाढून ७१,७२१ वर बंद झाला. तर निफ्टी २८ अंकांच्या किरकोळ वाढीसह २१,६४७ वर स्थिरावला. (Closing Bell)
क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र कल दिसून आला. कॅपिटल गुड्स निर्देशांक १ टक्‍क्‍यांनी आणि आयटी निर्देशांक ०.५ टक्‍क्‍यांनी घसरला. तर ऑटो, ऑईल आणि गॅस निर्देशांकात प्रत्येकी १ टक्‍क्‍यांची वाढ झाली. BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी प्रत्येकी ०.७ टक्के वाढ नोंदवली.
संबंधित बातम्या 

Polycab India ला तगडा झटका! एका कारवाईने शेअर्स २० टक्क्यांनी घसरले
Google चा पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ! नेमकं कारण काय?
‘एनपीएस’मध्ये क्यूआर कोडची सुविधा, तत्काळ रक्कम जमा होणार

आशियाई बाजारातील तेजीचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारानेही आज गुरुवारी सलग तिसर्‍या दिवशी तेजीत सुरुवात केली होती. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० हून अधिक ७१,९४० वर पोहोचला. तर निफ्टी २१,६६० वर होता.
सेन्सेक्स आज ७१,९०७ वर खुला झाला होता. त्यानंतर तो खाली येऊन ७१,७०० वर स्थिरावला. सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर्स टॉप गेनर राहिला. हा शेअर्स २.६२ टक्के वाढून २,७१९ रुपयांवर गेला. त्याचबरोबर ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक हे शेअर्सही वाढले. तर इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, एलटी, सन फार्मा हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर हिरोमोटोकॉर्प, बजाज ऑटो, रिलायन्स, ॲक्सिस बँक, बीपीसीएल हे टॉप गेनर्स होते. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, डॉ. रेड्डीज, एसबीआय लाईफ, विप्रो, इन्फोसिस हे शेअर्स टॉप लूजर्स होते.
रिलायन्सचे बाजार भांडवल १८ लाख कोटींवर
हेवीवेट रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स (Shares of Reliance Industries) आज २ टक्क्यांहून अधिक वाढून २,७२१ रुपयांवर पोहोचले. या दरम्यान RILच्या बाजार भांडवलाने १८ लाख कोटींचा टप्पा ओलांडला. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.
Polycab ला मोठा दणका, शेअर्स धडाधड कोसळले
आयकर विभागाने अलीकडेच पॉलीकॅब समूहावर छापे टाकल्यानंतर सुमारे १ हजार कोटी रुपयांची “बेहिशेबी रोख विक्री” आढळून आली. यामुळे विद्युत उपकरणे उत्पादक पॉलीकॅबचे शेअर्स (Polycab India) आजच्या व्यवहारात धडाधड कोसळले. हे शेअर्स आज २० टक्क्यांनी घसरून ३,८९० रुपयांच्या दिवसाच्या निचांकी पातळीवर आले. पॉलीकॅबचे शेअर्स एका दिवसात १ हजार रुपयांनी कमी झाला. (Polycab India Share Price)
मालदीव वाद : Easy Trip Planners चे शेअर्स १७ टक्क्यांनी वाढले
EaseMyTrip हे ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल चालवणाऱ्या Easy Trip Planners चे शेअर्स आज १७ टक्क्यांनी वाढले. बीएसई आणि एनएसई या दोन्हींवर हे शेअर्स वधारले. भारत- मालदीव वादादरम्यान मालदीवसाठी सर्व फ्लाइट बुकिंग निलंबित करण्याची घोषणा EaseMyTrip ने केली होती. त्यानंतर मालदीव असोसिएशन ऑफ ट्रॅव्हल एजंट्स अँड टूर ऑपरेटर्स (MATATO) ने EaseMyTrip चे सीईओ निशांत पिट्टी यांना पत्र लिहिले होते. या पत्रात, MATATO ने लिहिले, “पर्यटन हा मालदीवचा प्रमुख व्यवसाय आहे. जो आमच्या GDP मध्ये दोन तृतीयांश योगदान देत आहे आणि सुमारे ४४ हजार मालदीववासीय थेट पर्यटन क्षेत्रात काम करतात. पर्यटन उद्योग त्यांना उपजीविका प्रदान करते. पर्यटनावरील संभाव्य प्रतिकूल परिणामामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.” दरम्यान Easy Trip Planners चे शेअर्स बीएसईवर १७ टक्क्यांनी वाढून ५१ रुपयांवर पोहोचले.
Latest Marathi News सेन्सेक्स, निफ्टी तेजीत बंद, मालदीव वादात Easy Trip शेअर्सची रॉकेट भरारी Brought to You By : Bharat Live News Media.