मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनाला अपघात; वाहनचालक जखमी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांचा गुरुवारी (दि.111ृ) अनंतनागला जात असताना अपघात झाला. या अपघातामध्ये मुफ्ती बचावल्या आहेत. तर, त्यांचा वाहन चालक जखमी झाला आहे, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील संगम भागात ही दुर्घटना घडली. पक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये वाहन चालकाच्या पायाला दुखापत झाली आहे. नुकत्याच लागलेल्या आगीच्या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी मुफ्ती खानाबल येथे जात होत्या. (Mehbooba Mufti)
Glad to know that @jkpdp President @MehboobaMufti and those traveling with her are safe. I hope everyone involved is fine. Good wishes to Mehbooba ji. https://t.co/3Fq7VJHnn7
— Salman Anees Soz (@SalmanSoz) January 11, 2024
हेही वाचा :
Prabhu Shree Ram Song : आदर्श शिंदेच्या दमदार आवाजातील ‘प्रभू श्रीराम’ सुंदर गाण्याची निर्मिती
Delhi-NCR Earthquake : ब्रेकिंग! दिल्ली-NCR मध्ये भूकंपाचे धक्के
Vel Amavasya : शेतकऱ्यांनी उत्साहात साजरी केली ‘वेळ अमावस्या’
Latest Marathi News मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनाला अपघात; वाहनचालक जखमी Brought to You By : Bharat Live News Media.
