अंगणवाडी सेविका, मदतनीस मागण्यांवर ठाम

पैठण; पुढारी वृत्तसेवा (चंद्रकांत अंबिलवादे) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 39 दिवसांपासून संप सुरू केला आहे. या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी २४ तासाच्या आत कामावर रुजू न झाल्यास सेवेतून कमी करण्याची नोटीस देणाऱ्या प्रशासनाचा निषेध आंदोलन आज (दि११) पंचायत समिती परिसरात … The post अंगणवाडी सेविका, मदतनीस मागण्यांवर ठाम appeared first on पुढारी.

अंगणवाडी सेविका, मदतनीस मागण्यांवर ठाम

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा (चंद्रकांत अंबिलवादे) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या अंतर्गत असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या 39 दिवसांपासून संप सुरू केला आहे. या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी २४ तासाच्या आत कामावर रुजू न झाल्यास सेवेतून कमी करण्याची नोटीस देणाऱ्या प्रशासनाचा निषेध आंदोलन आज (दि११) पंचायत समिती परिसरात केले. १६ जानेवारीपासून कार्यालयात बसून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा यावेळी राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आला आहे.
गेल्या 39 दिवसापासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा विविध मागण्यांसाठी संप सुरू असल्याने सेवेतून कमी करण्याच्या व कारणे दाखवा नोटीस प्रशासनाकडून देण्यात आल्या. त्यामुळे संपात सहभाग झालेल्या अंगणवाडी कर्मचारी युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. बेकायदेशीर नोटीस देणाऱ्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज पंचायत समितीच्या परिसरात ३०० हून अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी निषेध केला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही व लेखी पत्र मिळत नाही तोपर्यंत अंगणवाडीवर रुजू होणार नाही, अशी आक्रमक भूमिका जाहीर केली. तसेच १६ जानेवारी रोजी कार्यालयात बसून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचे निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी शिवाजी वने यांना दिले आहे.
यावेळी कॉ. प्रा. राम बाहेती, कॉ. तारा बनसोडे, कॉ. अनिल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा आडसरे, उषा शेळके, ज्योती गायकवाड, संगीता साखरे, सिला साठे, स्वर्ण वरकड, आरती नलावडे, अर्चना माळी, आशा दिलवाले, अमृता घनवट, दीपिका राठोड, संगीता ढंग यांनी सहभाग घेतला होता.
हेही वाचा : 

आदिवासींचे आरक्षण कुणालाही मिळणार नाही : दिलीप वळसे पाटील
अपात्रतेच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंची पोस्ट चर्चेत
नवाब मलिक यांना मोठा दिलासा! जामिनाला ६ महिन्यांची मुदतवाढ

Latest Marathi News अंगणवाडी सेविका, मदतनीस मागण्यांवर ठाम Brought to You By : Bharat Live News Media.