मावळात आता 7 ऐवजी 12 महसूल मंडळ

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात आली असून, यामुळे तालुक्यात याआधी असलेल्या 7 महसूल मंडळांमध्ये वडेश्र्वर, परंदवडी, टाकवे बुद्रुक, टाकवे खुर्द व कुसगाव बुद्रुक हे 5 नवीन महसूल मंडळ वाढले आहेत. त्यामुळे तालुक्यातील महसूल मंडळांची संख्या दुपटीने वाढली असून, आता तालुक्यात 12 महसूल मंडळ असणार आहेत, अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी … The post मावळात आता 7 ऐवजी 12 महसूल मंडळ appeared first on पुढारी.

मावळात आता 7 ऐवजी 12 महसूल मंडळ

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना करण्यात आली असून, यामुळे तालुक्यात याआधी असलेल्या 7 महसूल मंडळांमध्ये वडेश्र्वर, परंदवडी, टाकवे बुद्रुक, टाकवे खुर्द व कुसगाव बुद्रुक हे 5 नवीन महसूल मंडळ वाढले आहेत. त्यामुळे तालुक्यातील महसूल मंडळांची संख्या दुपटीने वाढली असून, आता तालुक्यात 12 महसूल मंडळ असणार आहेत, अशी माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
अधिकार्‍यांवरील कामाचा ताण कमी होणार
तालुक्यात याआधी वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे, खडकाळा, काले, शिवणे, कार्ला व लोणावळा अशी 7 महसूल मंडळ कार्यरत होती. या सात मंडळांच्याअंतर्गत 71 सजांचा कारभार चालत होता. दरम्यान, दि. 15 फेब्रुवारी 2018 रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी काढलेल्या अंतिम अधिसूचनेनुसार तब्बल 6 वर्षांनी ही कार्यवाही झाली आहे. दरम्यान, मंडल अधिकारी कार्यालयांचे विभाजन होऊन विस्तारीकरण झाल्यामुळे मंडल अधिकार्‍यांवर असणारा कामाचा ताण कमी होणार असून, तालुक्यातील नागरिकांना मंडल अधिकारी कार्यालय आपल्याजवळ आल्याने सोयीचे होणार आहे. संबंधित नवीन महसूल मंडळांसाठी मंडल अधिकार्‍यांचीही नेमणूक करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.
मंडल व समाविष्ट सजा पुढीलप्रमाणे

 वडगाव मावळ : वडगाव, कातवी, नवलाख उंबरे, बधलवाडी, आंबळे, निगडे
 तळेगाव दाभाडे : तळेगाव, वराळे, आंबी, इंदोरी, सोमाटणे
 खडकाळा : खडकाळा, कुसगाव खुर्द, कान्हे, नायगाव, जांभूळ, साते
 कार्ला : कार्ला, वेहेरगाव, मळवली, औंढे खुर्द, ताजे
 काले : काले, मोरवे, चावसर, दुधीवरे, शिळींब, जोवण, कोथूर्णे, करुंज
 लोणावळा : लोणावळा, खंडाळा, कुणे नामा, उढेवाडी, कुरवंडे, भुशी
 शिवणे : शिवणे, चांदखेड, दिवड, बौर, शिवली, करूंज, आढले बुद्रुक
 वडेश्र्वर (नवीन) : वडेश्वर, नागाथली, कशाळ, खांड, किवळे, इंगळून, माळेगाव बुद्रुक
 टाकवे बुद्रुक (नवीन) : टाकवे बुद्रुक, माऊ, करंजगाव, घोणशेत, नाणे, कांब्रे नामा
 टाकवे खुर्द (नवीन) : टाकवे खुर्द, थोराण, खांडशी, पाथरगाव
 परंदवडी (नवीन) : परंदवडी, दारूंब्रे, उर्से, गहुंजे
 कुसगाव बुद्रुक (नवीन) : कुसगाव बुद्रुक, नांगरगाव, डोंगरगाव, वरसोली, वलवण, तुंगार्ली, वाकसई.

हेही वाचा

Nashik Crime : काठेगल्लीत एकावर प्राणघातक हल्ला
कौतुकास्पद ! स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याची 20 व्यावरुन 10 व्या स्थानावर झेप
शंभर दिवसांनंतरही जनरल मोटर्स कामगारांचे प्रश्न जैसे थे

Latest Marathi News मावळात आता 7 ऐवजी 12 महसूल मंडळ Brought to You By : Bharat Live News Media.