पापाचे प्रायश्चित्य घेण्याची संधी गमावली : भाजपची काँग्रेसवर बोचरी टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रणावर काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींनी नाकारलेआहे.  यावरुन ‘पापाचे प्रायश्चित्य घेण्याची संधी गमावली’, अशा शब्‍दांमध्‍ये भाजप नेत्‍यांनी काॅंग्रेसवर बाेचरी टीका केली आहे.  (BJP On Congress) महात्मा गांधींनी स्वतः रामराज्याची कल्पना केली होती; परंतु काँग्रेसने रामाला काल्पनिक म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस आता गांधींची नाही तर नेहरूंची झाली आहे, असा आरोप देखील भाजपने … The post पापाचे प्रायश्चित्य घेण्याची संधी गमावली : भाजपची काँग्रेसवर बोचरी टीका appeared first on पुढारी.

पापाचे प्रायश्चित्य घेण्याची संधी गमावली : भाजपची काँग्रेसवर बोचरी टीका

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रणावर काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींनी नाकारलेआहे.  यावरुन ‘पापाचे प्रायश्चित्य घेण्याची संधी गमावली’, अशा शब्‍दांमध्‍ये भाजप नेत्‍यांनी काॅंग्रेसवर बाेचरी टीका केली आहे.  (BJP On Congress) महात्मा गांधींनी स्वतः रामराज्याची कल्पना केली होती; परंतु काँग्रेसने रामाला काल्पनिक म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेस आता गांधींची नाही तर नेहरूंची झाली आहे, असा आरोप देखील भाजपने केला आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने माजी नेते प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्न पुरस्कार सोहळ्यावरही बहिष्कार टाकला होता, असेही भाजपने म्‍हटलं आहे.(BJP On Congress)
राम मंदिराला काँग्रेसचा सुरुवातीपासूनच विरोध : खा. हरनाथ सिंह यादव
भाजप खासदार हरनाथ सिंह यादव काँग्रेसवर निशाणा साधत म्हणाले, “काँग्रेसने रामजन्मभूमीवर मंदिराला सुरुवातीपासूनच विरोध केला. मार्गात अडथळे आणण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांना त्यांची पापे आणि गुन्हे धुवून काढण्याची संधी मिळाली होती, पण त्यांनी तेही गमावले. या देशातील जनता प्रभू रामाच्या पाठीशी उभी आहे.”
काँग्रेसच नाही तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही निमंत्रण नाकारले. त्यांनाही वडिलांच्या चुकांचे प्रायश्चित्त करता आले असते; पण त्यांनी ही संधी गमावली. या देशात राम आणि कृष्णविरोधी शक्ती प्रबळ होत आहेत. या सर्व हिंदुविरोधी शक्ती आहेत, असा आराेपही खासदार हरनाथ सिंह यादव यांनी केला आहे.
 BJP On Congress : काँग्रेसच्या निर्णयाने आश्चर्य वाटले नाही : मंत्री प्रल्हाद जोशी
काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठाचे निमंत्रण नाकारल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, “काँग्रेस पक्षाची सुरुवातीपासूनच हीच वृत्ती आहे. सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर उद्घाटन झाले तेव्हाही तत्कालीन राष्ट्रपतींनी तिथे जाण्याचा निर्णय घेतला होता; पण तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेस पक्षाने या निर्णयाला विरोध केला. त्या दिवसापासून काँग्रेस पक्ष तुष्टीकरणासाठी हिंदू धर्मांना सतत विरोध करत आहे. या 30-40 वर्षात जेव्हा-जेव्हा राम मंदिराचा मुद्दा पुढे आला, त्यांनी एकतर त्यावर टीका केली किंवा विरोध केला. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचे मला आश्चर्य वाटले नाही.” .
हेही वाचा:

Shiv Sena MLA disqualification : नार्वेकरांनी संविधानाचा घोर अपमान केला!, सत्यजित पाटील-सरूडकर यांचा निशाणा
राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : उत्तर प्रदेशच्‍या बाजारपेठांमध्‍ये हाेणार तब्‍बल १० हजार कोटींची उलाढाल
पंतप्रधान मोदी येणार असल्याने गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

Latest Marathi News पापाचे प्रायश्चित्य घेण्याची संधी गमावली : भाजपची काँग्रेसवर बोचरी टीका Brought to You By : Bharat Live News Media.