काठेगल्लीत एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक : काठेगल्ली परिसरात चौघांनी मिळून युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि.९) घडली. या हल्ल्यात कल्पेश दीपक कुलकर्णी (२४, रा. काठेगल्ली) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. कल्पेशच्या फिर्यादीनुसार, संशयित सुमीत पगारे, विकी उर्फ अक्षय झावरे, आकाश पगारे व मुन्ना कासार यांनी हल्ला केला. संशयितांनी पानटपरी चालकाकडे खंडणीची मागणी करीत दगडफेक केली. यामुळे कल्पेश … The post काठेगल्लीत एकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

काठेगल्लीत एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक : काठेगल्ली परिसरात चौघांनी मिळून युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि.९) घडली. या हल्ल्यात कल्पेश दीपक कुलकर्णी (२४, रा. काठेगल्ली) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. कल्पेशच्या फिर्यादीनुसार, संशयित सुमीत पगारे, विकी उर्फ अक्षय झावरे, आकाश पगारे व मुन्ना कासार यांनी हल्ला केला. संशयितांनी पानटपरी चालकाकडे खंडणीची मागणी करीत दगडफेक केली. यामुळे कल्पेश याने संशयितांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी कल्पेशवर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
कारची काच फोडून चोरी
नाशिक : कॉलेज रोडवरील मझाली हॉटेलबाहेर चोरट्याने कारची काच फोडून कारमधील ३७ हजार रुपयांचा किंमती ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी (दि.९) सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास हा प्रकार घडला. विवेक प्रभाकर सम्मनवार (४५, रा. पुणे) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्याने कारची काच फोडून कारमधील चार्जर, एअरपॉड, एअरफोन, डेबीट-क्रेडीट कार्ड, महत्वाची कागदपत्रे व २ हजार रुपयांची रोकड असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :

Vel Amavasya : शेतकऱ्यांनी उत्साहात साजरी केली ‘वेळ अमावस्या’
सकारात्मक बातमी ! सासवड नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात प्रथम
पंतप्रधान मोदी येणार असल्याने गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

Latest Marathi News काठेगल्लीत एकावर प्राणघातक हल्ला Brought to You By : Bharat Live News Media.