अयोध्‍येत ‘दिवाळी’..! : बाजारपेठांमध्‍ये हाेणार तब्‍बल १० हजार कोटींची उलाढाल

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठापणा सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्‍ज झाला आहे. देशातील सर्वात मोठा सण दिवाळी सणासारखेच चैतन्‍य उत्तर प्रदेशमध्‍ये आहे. २२ जानेवारी रोजी होणार्‍या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी जनतेमध्‍ये प्रचंड उत्‍साहाचे वातावरण आहे. दरम्‍यान, हा लोकोत्‍सव साजरा करताना उत्तर प्रदेशमधील बाजारपेठे सज्‍ज झाली असून, या दिवशी राज्यात ६५०० हून अधिक विवाह होणार आहेत. … The post अयोध्‍येत ‘दिवाळी’..! : बाजारपेठांमध्‍ये हाेणार तब्‍बल १० हजार कोटींची उलाढाल appeared first on पुढारी.
अयोध्‍येत ‘दिवाळी’..! : बाजारपेठांमध्‍ये हाेणार तब्‍बल १० हजार कोटींची उलाढाल

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठापणा सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्‍ज झाला आहे. देशातील सर्वात मोठा सण दिवाळी सणासारखेच चैतन्‍य उत्तर प्रदेशमध्‍ये आहे. २२ जानेवारी रोजी होणार्‍या प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्यासाठी जनतेमध्‍ये प्रचंड उत्‍साहाचे वातावरण आहे. दरम्‍यान, हा लोकोत्‍सव साजरा करताना उत्तर प्रदेशमधील बाजारपेठे सज्‍ज झाली असून, या दिवशी राज्यात ६५०० हून अधिक विवाह होणार आहेत. सुमारे 10 हजार कोटी रुपयांच्‍या उलाढालीसाठी बाजारपेठ सज्‍ज झाली आहे, असे वृत्त ‘अमर उजाला’ने दिले आहे. ( Ayodhya Ram Mandir Pran Prampratistha ceremony)
७८हून अधिक उत्‍पादने बाजारात उपलब्‍ध
दिवाळी नवरात्री आणि धनत्रयोदशीप्रमाणेच 22 जानेवारीला डिलिव्हरीसाठी नागरिकांनी आतापर्यंत सुमारे 22 हजार वाहनांची बुकिंग केली आहे. सोन्या-चांदीचा राम दरबार, नाणी, राम मंदिराच्या आकाराची अंगठी यासह 78 हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. गुजरातमधून राम दरबाराचे कपडे उत्तर प्रदेशमध्‍ये पोहोचत आहेत. राज्यात एकाच दिवशी ६५०० हून अधिक विवाह होणार आहेत. एकूणच सुमारे 10 हजार कोटी रुपयांची बाजारपेठ तयार आहे.
22 हजार वाहनांची बुकिंग, राम मंदरिाच्‍या आकारातील अंगठी….
उत्तर प्रदेशात रामोत्सवाला लोकोत्‍सवाचे स्वरूप आले आहे. नवरात्री आणि धनत्रयोदशीप्रमाणेच 22 जानेवारीला डिलिव्हरीसाठी लोकांनी आतापर्यंत सुमारे 22 हजार वाहनांची बुकिंग केली आहे, तर सोन्या-चांदीचा राम दरबार, नाणी, राम मंदिराच्या आकाराची अंगठी यासह 78 हून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. गुजरातमधून राम दरबाराचे कपडे यूपीत पोहोचत आहेत. राज्यात एकाच दिवशी ६५०० हून अधिक विवाह होणार आहेत. एकूणच सुमारे 10 हजार कोटी रुपयांची बाजारपेठ तयार आहे. राम मंदिर मॉडेलला बाजारात सर्वाधिक मागणी आहे.
राम मंदिर मॉडेलला बाजारात सर्वाधिक मागणी
सध्या श्री राम मंदिर मॉडेलला सर्वाधिक मागणी आहे. हे तांबे, पितळ, चांदी, हार्डबोर्ड, लाकूड बनवले जात आहेत. एकट्या १५ हजारांहून अधिक हस्तकलाकार आणि कारागीर हे मॉडेल तयार करत असल्याची माहिती हस्तकला विभागाकडून देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश रेडीमेड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धीरज शाह यांनी सांगितले की, भगव्या रंगाच्या कपड्यांना मागणी जास्त आहे. टी-शर्ट, कॅप, हुडीज, शाल आणि जॅकेटसाठी बुकिंग आहे. दुसरीकडे खादी कुर्ते आणि शर्टची मागणी पाच पटीने वाढली आहे.
सुमारे दोन कोटी दिव्यांची विक्री
आतापर्यंत सुमारे दोन कोटी दिव्यांची विक्री झाली आहे. उत्तर प्रदेश माती कला मंडळाने दिलेल्‍या माहितीनुसार, 22 जानेवारीपर्यंत सर्व जिल्ह्यांमधून तसेच शेजारील जिल्ह्यांमधून दिव्यांच्या ऑर्डर प्रलंबित आहेत. पुरवठा होत नसल्याची परिस्थिती आहे.
दीड लाखांहून अधिक लाडूची ऑर्डर
फेडरेशन ऑफ हॉटेल-रेस्टॉरंट अँड स्वीट हाऊसचे पीके गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, 1.5 लाख किलोपेक्षा जास्त लाडूंच्या आगाऊ ऑर्डर आधीच मिळाल्या आहेत. फुलांचे भावही वाढले आहेत. झेंडू आणि गुलाबाची मागणी लक्षात घेऊन संपूर्ण राज्यातून त्यांची खरेदी केली जात आहे. फुले जास्त काळ साठवून ठेवता येत नसल्याने 19 तारखेपासूनच 22 चे आगाऊ बुकिंग करण्यात आले आहे.
3.5 कोटी चौरस फूट फ्लेक्स होर्डिंगची होणार विक्री
. फ्लेक्स मार्केटचे मोठे व्यापारी विनोद कुमार यांनी सांगितले की, लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज, मेरठ, आग्रा, गाझियाबाद, नोएडा आणि गोरखपूर येथून केवळ राम मंदिराशी संबंधित कार्यक्रम, उत्सव आणि अभिनंदनासाठी 80 लाख स्क्वेअर फूट बुक करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्‍ये अंदाजाने 3.5 कोटी चौरस फूट फ्लेक्स होर्डिंग विकले जातील. उत्तर प्रदेश बुलियन असोसिएशन आणि ऑल इंडिया गोल्ड स्मिथ ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, राज्यातील राम मंदिराशी संबंधित सोने आणि चांदीची विक्री किमान ४०० कोटी रुपयांची असल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : 

Ram Pran Pratishtha ceremony : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत १०० चार्टर्ड विमाने उतरणार
राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : ११ हजारांहून अधिक ‘व्‍हीआयपीं’ना मिळणार ‘खास’ भेटु
राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : सरसंघचालक म्‍हणाले, “भारत स्‍वबळावर…”
राम मंदिरासाठी २४,००० किलोची घंटा; २ किमी अंतरापर्यंत घंटानाद

 
Latest Marathi News अयोध्‍येत ‘दिवाळी’..! : बाजारपेठांमध्‍ये हाेणार तब्‍बल १० हजार कोटींची उलाढाल Brought to You By : Bharat Live News Media.