पिंपरी : सांगवीत आजपासून पवनाथडी जत्रा

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे गुरूवार (दि.11) पासून पाच दिवस पवनाथडी जत्रा रंगणार आहे. जत्रेचे उद्घाटन सायंकाळी पाचला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार आहे.
महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू, साहित्य तसेच, खाद्यपदार्थ विक्रीचे तब्बल 750 स्टॉल आहेत. तृतीयपंथी व दिव्यांग बचत गटांचेही स्टॉल असणार आहेत.
यानिमित्त ऑर्केस्टा, नाटक, लावणी, गोंधळ, सनई चौघडा, वाघ्या-मुरळीची जुगलबंदी, महाराष्ट्राची लोकधारा अशा अनेक लोककलांचे सादरीकरण केले जाणार आहे. बालगोपाळांसाठी विविध मनोरंजनाचे खेळ व खेळणी असणार आहेत. जत्रेत पाच दिवस विविध कलाकार, लोकप्रतिनिधी भेट देणार आहेत. जत्रेच्या ठिकाणी पुरेशी विद्युत प्रकाश व्यवस्था, साफसफाई, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वाहनतळाची सुविधा उपलब्ध करून ठेवण्यात आली आहे. तसेच, अग्निशमन यंत्रणा व रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आले आहेत.
या जत्रेस सहकुटुंब सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन समाज विकास विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले आहे.
हेही वाचा
Pimpri News : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची 10 किलोमीटर मार्गिका पूर्ण
आदिवासींचे आरक्षण कुणालाही मिळणार नाही : दिलीप वळसे पाटील
हिंगोली : आई, वडीलासह मुलाचा अंत; उपचारासाठी निघाले होते कुटुंब
Latest Marathi News पिंपरी : सांगवीत आजपासून पवनाथडी जत्रा Brought to You By : Bharat Live News Media.
