शनीच्या चंद्रावर ‘जादू’ची बेटं!

वॉशिंग्टन ः शनीचे शंभरपेक्षाही अधिक चंद्र आहेत. मात्र त्यापैकी टायटन, एन्सिलाडससारखे काही चंद्र खगोलशास्त्रज्ञांच्या कुतुहलाचा आणि संशोधनाचा भाग बनलेले आहेत. ‘टायटन’वर सध्या अशी स्थिती आहे जी पृथ्वीवर सुरुवातीच्या काळात होती असे म्हटले जाते. टायटनवर मिथेनची सरोवरे व समुद्रही आहेत. विशेष म्हणजे त्यावर काही ‘जादू’ची वाटणारी बेटंही आहेत. त्यांचे निरीक्षण करीत असताना ही बेटं सरोवरावर एखाद्या … The post शनीच्या चंद्रावर ‘जादू’ची बेटं! appeared first on पुढारी.

शनीच्या चंद्रावर ‘जादू’ची बेटं!

वॉशिंग्टन ः शनीचे शंभरपेक्षाही अधिक चंद्र आहेत. मात्र त्यापैकी टायटन, एन्सिलाडससारखे काही चंद्र खगोलशास्त्रज्ञांच्या कुतुहलाचा आणि संशोधनाचा भाग बनलेले आहेत. ‘टायटन’वर सध्या अशी स्थिती आहे जी पृथ्वीवर सुरुवातीच्या काळात होती असे म्हटले जाते. टायटनवर मिथेनची सरोवरे व समुद्रही आहेत. विशेष म्हणजे त्यावर काही ‘जादू’ची वाटणारी बेटंही आहेत. त्यांचे निरीक्षण करीत असताना ही बेटं सरोवरावर एखाद्या ठिपक्यासारखी दिसतात आणि नंतर गायब होतात. आता त्यांचे हे गूढ उकलण्यास संशोधकांना यश आले आहे.
याबाबतच्या संशोधनाची माहिती जिओफिजिकल रिसर्च लेटर्समध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की ही बेटं म्हणजे गोठलेल्या ऑर्गेनिक मटेरियलचे म्हणजेच जैविक सामग्रीचे तरंगते ढिगारे आहेत. सॅन अँटोनियोमधील टेक्सास युनिव्हर्सिटीतील खगोल शास्त्रज्ञ झिनटिंग यू यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, ही बेटं खरोखरच जैविक सामग्रीने बनलेली आहेत का हे मला पाहायचे होते. पृथ्वीवरही अशा स्वरूपाची बेटं आहेत. ‘टायटन’ हा चंद्र आपल्या सौरमालिकेतील एक अनोखे ठिकाण आहे. पृथ्वीवर ज्याप्रमाणे जलीय चक्र असते तसे टायटनवर मिथेनचे चक्र असते. तिथे द्रवरूप पाण्याच्या समुद्राऐवजी द्रवरूप मिथेनचे समुद्र, सरोवरे आहेत. या मिथेनच्या समुद्रांच्या लाटा काही मिलीमीटर उंचीच्याच असतात. या चंद्रावर ऑक्सिजनचे वातावरण असण्याऐवजी तिथे ऑर्गेनिक मॉलेक्युल्सने म्हणजेच जैविक रेणूंनी भरलेले ढग असतात.

Latest Marathi News शनीच्या चंद्रावर ‘जादू’ची बेटं! Brought to You By : Bharat Live News Media.