राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत १०० चार्टर्ड विमाने उतरणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोमवारी २२ जानेवारी रोजी आयोध्येत ‘ राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा’ पार पडत आहे. दरम्यान या दिवशी अयोध्येत 100 चार्टर्ड विमाने उतरतील, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी (दि.११) दिली. (Ram Pran Pratishtha ceremony) ते पुढे बोलताना म्हणाले, सोमवारी २२ जानेवारीला राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक … The post राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत १०० चार्टर्ड विमाने उतरणार appeared first on पुढारी.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत १०० चार्टर्ड विमाने उतरणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सोमवारी २२ जानेवारी रोजी आयोध्येत ‘ राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा’ पार पडत आहे. दरम्यान या दिवशी अयोध्येत 100 चार्टर्ड विमाने उतरतील, अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी (दि.११) दिली. (Ram Pran Pratishtha ceremony)
ते पुढे बोलताना म्हणाले, सोमवारी २२ जानेवारीला राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक मान्यवर अयोध्येत हजेरी लावत आहेत. यानिमित्ताने १०० चार्टर्ड विमाने अयोध्या विमानतळावर उतरतील. यामुळे अयोध्या विमानतळाची क्षमता तपासण्याचा मार्गही दिसून येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. (Ram Pran Pratishtha ceremony)
सीएम योगी म्हणाले, “उत्तर प्रदेशला चौथा आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आभारी आहे. अयोध्या विमानतळाचे 30 डिसेंबर रोजी उद्घाटन झाले.” 30 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केले. नंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की महर्षी वाल्मिकींचे रामायण हा ज्ञानाचा मार्ग आहे जो आपल्याला श्रीरामाशी जोडतो, असे देखील योगींनी स्पष्ट केले. (Ram Pran Pratishtha ceremony)

“100 chartered planes will land in Ayodhya on January 22”, says UP CM Yogi Adityanath
Read @ANI Story | https://t.co/hYXr6P4HXT#RamMandir #PranPratishtha #YogiAdityanath #Ayodhya pic.twitter.com/8X3uashWcB
— ANI Digital (@ani_digital) January 11, 2024

केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, केंद्रीय मंत्री व्हीके सिंह आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी अहमदाबाद आणि अयोध्या दरम्यान पहिल्या तिरंगी साप्ताहिक विमानाचा शुभारंभ केला. दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अहमदाबाद ते अयोध्या दरम्यानच्या पहिल्या तिरंगी साप्ताहिक फ्लाइटसाठी बोर्डिंग पास मिळाला. पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ३० डिसेंबर रोजी अयोध्या विमानतळ आणि रेल्वे स्टेशनचे उद्घाटन केल्याचे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:

Ram Mandir Inauguration : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर! ‘या’ राज्य सरकारचा मोठा निर्णय
Ayodhya | ‘मशिदीत जय श्रीराम म्हणा’ : मुस्लिमांसह, इतर धर्मियांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भाग घ्यावा – RSS
Ram Mandir Inauguration: रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अन् सोनिया गांधी यांना आमंत्रण

 
Latest Marathi News राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अयोध्येत १०० चार्टर्ड विमाने उतरणार Brought to You By : Bharat Live News Media.