पांझराकान साखर कारखाना निश्चित सुरू होणार – डॉ. तुळशीराम गावित

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना या तालुक्याचे वैभव असून, कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. हा कारखाना पूर्ववत सुरू करून तालुक्याला गतवैभव मिळवून देणारच असा निर्धार धुळे जिल्हा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित यांनी व्यक्त केला. पांझराकान कारखान्यासंदर्भात पांझराकान बचाव समितीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील सभागृहात झालेल्या बैठकप्रसंगी डॉ.गावित … The post पांझराकान साखर कारखाना निश्चित सुरू होणार – डॉ. तुळशीराम गावित appeared first on पुढारी.

पांझराकान साखर कारखाना निश्चित सुरू होणार – डॉ. तुळशीराम गावित

पिंपळनेर; Bharat Live News Media वृत्तसेवा- तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना या तालुक्याचे वैभव असून, कोणत्याही परिस्थितीत कारखाना सुरू करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. हा कारखाना पूर्ववत सुरू करून तालुक्याला गतवैभव मिळवून देणारच असा निर्धार धुळे जिल्हा शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख डॉ.तुळशीराम गावित यांनी व्यक्त केला.
पांझराकान कारखान्यासंदर्भात पांझराकान बचाव समितीच्या न्यू इंग्लिश स्कूलमधील सभागृहात झालेल्या बैठकप्रसंगी डॉ.गावित बोलत होते. बैठकीला ज्येष्ठ कामगार नेते सुभाष काकुस्ते, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, प्राचार्य नरेंद्र तोरवणे, नामदेव देसले, सरपंच अजय सोनवणे, कामगार नेते अशोक भामरे, प्रदीप सोनवणे, वेडू सोनवणे आदींसह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कारखाना बचाव समितीचे सदस्य उपस्थित होते.
कारखाना भाडेपट्ट्याने देणे किंवा विक्रीसंदर्भात नुकतेच पुन्हा एक टेंडर प्रसिद्ध झाल्याने या अनुषंगाने या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला.बैठकीत कामगार नेते सुभाष काकुस्ते यांनी हा प्रकल्प सुरू करण्यासाठी कामगार पाठीशी राहून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. समितीचे प्राचार्य नरेंद्र तोरवणे यांनी कारखाना वाचविण्यासाठी बचाव समिती प्रयत्नशील असून,समितीच्या प्रयत्नांमुळेच पुन्हा एकदा टेंडरपर्यंत प्रक्रिया पोचली आहे. काही न्यायालयीन अडथळे दूर झाले तर टेंडर निघून आणखीन ही प्रक्रिया गतिशील होणार असल्याची माहिती देतानाच आमदार मंजुळा गावित,डॉ.तुळशीराम गावित शासनस्तरावर प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

दूध शीतकरण केंद्रावरही चर्चा
कारखान्यासोबतच दूध शीतकरण केंद्रदेखील वाचवून या केंद्राची महामार्गालगतची जागा शेतकऱ्यांच्या प्रकल्पासाठीच वापरली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. बैठकीत नामदेव देसले, अशोक भामरे यांनी देखील अनेक बाबींवर विस्तृतपणे मत व्यक्त केले.
Latest Marathi News पांझराकान साखर कारखाना निश्चित सुरू होणार – डॉ. तुळशीराम गावित Brought to You By : Bharat Live News Media.