मंदिरात प्रसाद म्हणून मिळणार ‘हेल्थ कार्ड’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– देशातील प्रत्येक धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद म्हणून ‘आयुष्यमान हेल्थ कार्ड’ देण्याची संकल्पना राबविली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्या नाशिक दौऱ्यात श्री काळाराम मंदिरापासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर देशभर हा पॅटर्न राबविण्यात येईल, अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली. (Ayushman Health Card) जिल्हाधिकारी … The post मंदिरात प्रसाद म्हणून मिळणार ‘हेल्थ कार्ड’ appeared first on पुढारी.
मंदिरात प्रसाद म्हणून मिळणार ‘हेल्थ कार्ड’

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा– देशातील प्रत्येक धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद म्हणून ‘आयुष्यमान हेल्थ कार्ड’ देण्याची संकल्पना राबविली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्या नाशिक दौऱ्यात श्री काळाराम मंदिरापासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर देशभर हा पॅटर्न राबविण्यात येईल, अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिली. (Ayushman Health Card)
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये बुधवारी (दि.१०) जिल्हास्तरीय आयुष्यमान भारत मिशनचा आढावा पार पडला. ‘आयुष्यमान हेल्थ कार्ड’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याची व्याप्ती वाढविताना अधिकाधिक जनतेला योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. देशातील धार्मिक स्थळांवर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता तेथे हेल्थकार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार मंदिरांमध्ये भाविक दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडण्यापूर्वी त्यांच्या मोबाइलमध्ये आयुष्यमान हेल्थ कार्ड जनरेट होणार आहे. (Ayushman Health Card)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार असून, श्री काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. वेळ उपलब्ध झाल्यास मोदींच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने कार्ड वितरण करण्यासाठी यंत्रणांकडून तयारी केली जात आहे.
त्र्यंबकलाही नियोजन
नाशिकमधील श्री काळाराम मंदिरात वर्षभर भाविकांचा राबता असतो. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरातदेखील लाखो भाविक दरवर्षी भगवान त्र्यंबकराजाच्या चरणी लीन होतात. त्यामुळे काळाराम मंदिर तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात हेल्थ कार्ड काढण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार असल्याचे यंत्रणांकडून सांगण्यात आले. Ayushman Health Card
हेही वाचा :

काय आहे कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर
रत्नागिरी : तोतया आयपीएस अधिकाऱ्याला उत्तरप्रदेशमधून केले गजाआड
Shiv Sena MLA disqualification verdict | अपात्रतेच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पोस्ट चर्चेत, ‘घराणेशाहीच्या बळावर….’

Latest Marathi News मंदिरात प्रसाद म्हणून मिळणार ‘हेल्थ कार्ड’ Brought to You By : Bharat Live News Media.