Crime News : भेटण्यासाठी बोलावून, त्याने तरुणीसोबत केलं असं काही !

पुणे : कंपनीत एचआर पदावर काम करणार्‍या तरुणीला भेटण्यासाठी बोलवून घेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 6) दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वडगाव शेरी परिसरात राहणार्‍या 24 वर्षीय तरुणीने ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण हराळ … The post Crime News : भेटण्यासाठी बोलावून, त्याने तरुणीसोबत केलं असं काही ! appeared first on पुढारी.

Crime News : भेटण्यासाठी बोलावून, त्याने तरुणीसोबत केलं असं काही !

पुणे : कंपनीत एचआर पदावर काम करणार्‍या तरुणीला भेटण्यासाठी बोलवून घेत तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवारी (दि. 6) दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वडगाव शेरी परिसरात राहणार्‍या 24 वर्षीय तरुणीने ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण हराळ (वय 28, रा. नर्‍हे, आंबेगाव) याच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एका मॅनेजमेंट कंपनीत एचआर पदावर काम करत आहे.
आरोपी प्रवीण याने फिर्यादी एचआर पदावर काम करत असताना तिच्या सोबत मैत्री केली. प्रवीण याने शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये तरुणीला भेटण्यासाठी बोलवून घेतले. फिर्यादी या त्याठिकाणी आल्या असता आरोपीने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या घरातील लोकांना समजले की तुझ्याशी मी लग्न करतो’ असे आमिष दाखवले. त्यानंतर प्रवीण हराळ याने तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. घाबरलेल्या तरुणीने पोलिस ठाण्यात आरोपी प्रवीण हराळ याच्या विरोधात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पालवे करत आहेत.
हेही वाचा

Google चा पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ! नेमकं कारण काय?
अवकाळी पावसामुळे जनावरांचा चारा भिजला
आमदार, खासदारांनी वारंवार पक्षांतरे करू नयेत : माजी उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू

Latest Marathi News Crime News : भेटण्यासाठी बोलावून, त्याने तरुणीसोबत केलं असं काही ! Brought to You By : Bharat Live News Media.