इशान, श्रेयसवर कारवाई नाही; द्रविडचा खुलासा
मोहाली; वृत्तसंस्था : इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघाबाहेर ठेवल्याच्या वृत्तावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याने मोठे विधान केले आहे. द्रविडने या वृत्ताचे खंडन केले आहे. अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्डकप 2024 पूर्वी भारताची ही शेवटची टी-20 मालिका आहे आणि त्यात इशान व अय्यर यांना वगळण्यामागे हे वृत्त सांगितले जात होते, ते चुकीचे असल्याचे द्रविडने स्पष्ट केले. (Rahul Dravid)
किशनने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) विश्रांतीची विनंती केली आणि त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतून मुक्त करण्यात आले. द्रविडने सांगितले की, किशनने अद्याप निवडीसाठी उपलब्ध असल्याचे बीसीसीआयला कळवलेले नाही. इथे शिस्तभंगाचा विषयच येत नाही. इशान किशन निवडीसाठी उपलब्ध नव्हता. इशानने विश्रांतीची विनंती केली, जी आम्ही दक्षिण आफ्रिकेत मान्य केली. आम्ही त्याला पाठिंबा दिला. त्याने अद्याप निवडीसाठी उपलब्ध असल्याचे कळवलेले नाही. जेव्हा तो उपलब्ध असेल, तेव्हा तो देशांतर्गत क्रिकेट खेळेल आणि निवडीसाठी स्वत:ला उपलब्ध करून देईल, असे द्रविडने आज पत्रकार परिषदेत सांगितले. (Rahul Dravid)
अय्यरबद्दल द्रविडने सांगितले की, नक्कीच, श्रेयस अय्यरच्या बाबतीत, त्याचा समावेश न करण्यामागे कोणतेही शिस्तभंगाचे कारण नाही. संघात अनेक फलंदाज होते. तो दक्षिण आफ्रिकेत टी-20 मालिका खेळला नाही. प्रत्येकाला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवणे सोपे नाही.
🗣️ 🗣️ It will be a good challenge against the Afghanistan spinners and we are looking forward to it#TeamIndia Head Coach Rahul Dravid ahead of the #INDvAFG T20I series starting tomorrow @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Tr6P7zOMSL
— BCCI (@BCCI) January 10, 2024
हेही वाचा :
India vs Afghanistan, 1st T20I : ‘अफगाण चॅलेंज’ आजपासून
Nashik News : युवा महोत्सवासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास नियंत्रण कक्ष
Nashik News : टँकरचालकांचा संप अखेर मागे, इंधनपुरवठा सुरळीत
The post इशान, श्रेयसवर कारवाई नाही; द्रविडचा खुलासा appeared first on Bharat Live News Media.