Google चा पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ! नेमकं कारण काय?

पुढारी ऑनलाईन : गुगल (Google) त्याच्या डिजिटल असिस्टंट, हार्डवेअर आणि इंजिनिअरींग टीममध्ये काम करणार्‍या शेकडो कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहे. खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हे पाऊल खर्च कमी करण्यासाठी कंपनीच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गुगलने १२ हजार कर्मचार्‍यांना प्रभावित करणार्‍या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नोकरकपातीची घोषणा केल्यानंतर जवळपास एक … The post Google चा पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ! नेमकं कारण काय? appeared first on पुढारी.

Google चा पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ! नेमकं कारण काय?

Bharat Live News Media ऑनलाईन : गुगल (Google) त्याच्या डिजिटल असिस्टंट, हार्डवेअर आणि इंजिनिअरींग टीममध्ये काम करणार्‍या शेकडो कर्मचार्‍यांना काढून टाकणार आहे. खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. हे पाऊल खर्च कमी करण्यासाठी कंपनीच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गुगलने १२ हजार कर्मचार्‍यांना प्रभावित करणार्‍या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नोकरकपातीची घोषणा केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतर हे घडले आहे.
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, गुगल असिस्टंट, व्हॉईस-अॅक्टिव्हेटेड तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये गुंतलेल्या कर्मचाऱ्यांवर आणि ऑगमेंटेड रिअॅलिटी हार्डवेअर टीममधील कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा फटका बसेल. कंपनीच्या सेंट्रल इंजिनिअरींग ऑर्गनायजेशनमध्येही नोकऱ्यांमध्ये कपात होणार आहे.
एका निवेदनात Google प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे की, “२०२३ च्या उत्तरार्धात आमच्या अनेक टीम्सनी कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आणि आमच्या सर्वोच्च उत्पादन प्राधान्यांनुसार संसाधने अधिक चांगल्या प्रकारे संरेखित करण्यासाठी बदल केले. काही टीम्स अजूनही या संघटनात्मक बदलांची अंमलबजावणी करत आहेत, ज्यामुळे दुर्दैवाने जागतिक पातळीवर नोकऱ्यांमध्ये कपात केली जात आहे.” दरम्यान, प्रभावित कर्मचार्‍यांना सांगण्यात आले आहे की त्यांना Google मध्ये इतर खुल्या पदांसाठी अर्ज करण्याची संधी मिळेल.
Google च्या काही कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अल्फाबेट वर्कर्स युनियनने सोशल नेटवर्कवर पोस्ट केलेल्या निवेदनात या नोकरकपातीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. युनियनने सांगितले की, “आमचे सदस्य आणि सहकारी आमच्या यजर्संसाठी उत्कृष्ट उत्पादने तयार करण्यासाठी दररोज परिश्रमपूर्वक काम करतात. कंपनी दर तिमाहीत अब्जावधीची कमाई करत असताना कर्मचाऱ्यांना काढून टाकणे अस्वीकार्य आहे. आमच्या नोकऱ्या सुरक्षित होईपर्यंत आम्ही लढत राहू!”
Latest Marathi News Google चा पुन्हा शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ! नेमकं कारण काय? Brought to You By : Bharat Live News Media.