निमंत्रण नाकारून काँग्रेसने रामभक्तांचा अवमान केला : बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला (Ayodhya Ram Mandir Inauguration)उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारून कोट्यवधी रामभक्तांचा अवमान केला आहे. जो न हित के राम का, वह न किसी के काम का, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात … The post निमंत्रण नाकारून काँग्रेसने रामभक्तांचा अवमान केला : बावनकुळे appeared first on पुढारी.

निमंत्रण नाकारून काँग्रेसने रामभक्तांचा अवमान केला : बावनकुळे

नागपूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : काँग्रेसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला (Ayodhya Ram Mandir Inauguration)उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारून कोट्यवधी रामभक्तांचा अवमान केला आहे. जो न हित के राम का, वह न किसी के काम का, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.
काँग्रेसची प्रभू रामचंद्रांच्याविरोधातील मानसिकता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. यापूर्वी सुप्रीम कोर्टात काँग्रेसने प्रभू रामचंद्रांच अस्तित्व नाकारलं होतं. रामायण काल्पनिक असल्याचा दावा केला होता. रामाच्या जन्माचे दाखले मागितले होते. मंदिराचा ७/१२ मागत होते. राम मंदिराच्या निर्मितीबाबत अतिशय खालच्या दर्जाची टिप्पणी करत होते. रामभक्तांची खिल्ली उडवत होते. आता पुन्हा एकदा करोडो भारतीयांच्या स्वप्नातील भव्य राम मंदिर उभारणी होत असताना काँग्रेसच्या पोटात दुखायला लागलं आहे. यापूर्वी काँग्रेसने अनेकवेळा हिंदूविरोधी भूमिका घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांची तीच मानसिकता समोर आली आहे. काँग्रेसने राम मंदिराच्या उद्घाटनाच निमंत्रण नाकारून करोडो रामभक्तांचा अवमान केला आहे. त्यामुळे ‘जो न हित के राम का वह न किसी के काम का’ हे काँग्रेसने लक्षात ठेवाव, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. (Ayodhya Ram Mandir Inauguration)
हेही वाचा : 

राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळा : ११ हजारांहून अधिक व्‍हीआयपींना मिळणार ‘खास’ भेट

MLA Disqualification Case : लोकशाहीची हत्या करणारा निर्णय : उद्धव ठाकरे

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड-शो होणार, पालकमंत्र्यांकडून मार्गाची पाहणी

Latest Marathi News निमंत्रण नाकारून काँग्रेसने रामभक्तांचा अवमान केला : बावनकुळे Brought to You By : Bharat Live News Media.