Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेत साहेबराव आणि मंजुळाच्या नात्याचं रहस्य दिवसेंदिवस उत्कंठावर्धक होतंय. अश्यातच मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. दाईमा असं नव्या पात्राचं नाव असून सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी माया जाधव दाईमा ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या दाईमाचं मंजुळासोबत खास नातं आहे. दाईमाच्या एन्ट्रीने अनेक नात्यांविषयीचा खुलासा होणार आहे. त्यामुळे तुझेच मी गीत गात आहे मालिकेचे पुढील भाग मनोरंजनाने परिपूर्ण असतील यात शंका नाही.
संबंधित बातम्या –
सत्यशोधक मराठी चित्रपटास करातून सूट
Sunny Leone New Song : सनी लिओनीचा “तेरी लाल चुनरिया”मध्ये जलवा (Video)
Pole Dancing Actress : क्रिती खरबंदा ते नेहा पेंडसे ‘या’ अभिनेत्री पोल डान्सिंगमध्ये माहिर
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकारांना आपण वेगवेगळ्या व्यक्तिरेखांमध्ये पाहिलं आहे. लवकरच माया जाधव यांना देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत पहाण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. माया जाधव यांनी अनेक सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. दाईमा आणि मंजुळाचं नेमकं नातं काय आहे हे जाणून घेणं रंजक ठरेल.
Latest Marathi News ‘तुझेच मी गीत गात आहे’मध्ये लावणी सम्राज्ञी माया जाधव.. Brought to You By : Bharat Live News Media.